1 min read

छत्रपतींचे कार्य, पराक्रम आणि विचार आजच्या तरुण पिढीच्या मनात, मेंदूत आणि वर्तनात रुजवणे काळाची गरज आहे : पत्रकार बालासाहेब शिंदे

Loading

छत्रपतींचे कार्य, पराक्रम आणि विचार आजच्या तरुण पिढीच्या मनात, मेंदूत आणि वर्तनात रुजवणे काळाची गरज आहे : पत्रकार बालासाहेब शिंदे
/ प्रतिनिधी
साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी केलेले अभुतपूर्वक कार्य संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आणि उद्दिष्ट पूर्तीसाठी नवचेतना देणारे आहे. मध्ययुगीन राजवटीत सुलतानाच्या विरोधात बंड करणे म्हणजे प्राणाशी गाठच. परंतु शिवाजी महाराजांनी या सुलतानशाहीला न जुमानता हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने मूठभर मावळ्यांच्या मदतीने महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा फडकवला. याचे कारण म्हणजे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम म्हणूनच छत्रपतींचे कार्य, पराक्रम आणि विचार आजच्या तरुण पिढीच्या मनात, मेंदूत आणि वर्तनात रुजवणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी केले.
मौजे हिप्पळनारी ता.मुखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दि.१९ फेब्रुवारी रविवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यअतिथी तथा प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्रराव शिंदे हया होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हासंघटक तथा दैनिक पुण्यनगरीचे ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, कै.रामचंद्र शिंदे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत रामचंद्र शिंदे, माजी सरपंच मधूकर कानोटे, उपसरपंच सौ.संगिता सुनिल कानोटे, ग्रा.पं.सदस्या सौ.सावित्रीबाई कोंडजी देशमुख, सौ.अनिता शिवाजी नागरवाड, तेजेराव नामदेवराव नागरवाड, सौ.अनुसया धनाजी भोसले, नवनाथ लक्ष्मण शिंदे, कु.प्रतिक्षा संग्राम शिंदे, मार्गदर्शक वामनराव देशपांडे, गोपाळराव कानोटे, राजेंद्र पाटील-बर्गे, व्यंकटराव कानोटे, गोविंदराव कानोटे, रघूनाथराव इंगळे उपस्थित होते.
यानिमित्त सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामपंचायत कार्यालय हिप्पळनारी व सार्वजनिक शिवजयंती मंडळाच्या वतीने येथील ग्रामपंचायत प्रांगणात सरपंच श्रीमती इंदरबाई रामचंद्रराव शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज‎ यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी गावातून जयघोष करित रॕली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामपंचायतीचे सदस्य, सदस्या, गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, महिला बचतगट, बालगोपाळ, शिवभक्त, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पदधिकारी उपस्थित होते. शिवजयंतीची सांगता शिवजयंती मार्गदर्शक प्रमुखअतिथी वक्ता, ज्येष्ठ पत्रकार बालासाहेब शिंदे यांच्या प्रखर भाषणांनी झाली. सर्व गावकऱ्यांना व शिवभक्त यांच्यासाठी समाजसेवक चंद्रकांत शिंदे यांच्या वतीने अल्पोहर, पिण्यासाठी पाण्याची उत्तमरित्या सोय करण्यात आली होती. शिवजयंती यशस्वीतेसाठी नरसिंग बनबरे, बालाजी जांभळे, रमेश देशमुख, रवि पाटील, हाणूमू देशमुख, लक्ष्मण नागरवाड, शेषेराव नागरवाड, धोंडीबा नागरवाड, एकनाथ पाटील-बर्गे विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *