खान्देश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजीत सर्व शाखीय माळी समाज उद्या वधु वर परिचय मेळावा ….
![]()

माळी समाज वधु-वर परिचय मेळावा 2023
धुळे :खान्देश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजीत सर्व शाखीय माळी समाज वधु वर परिचय मेळावा रविवार दिनांक 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता श्री राजर्षी शाहू महाराज नाट्यगृह /कला मंदिर पारोळा रोड धुळे येथे आयोजित करण्यात आला आहे . खानदेश माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व कळमसरे ता.अमळनेर येथील मा.सरपंच मुरलीधर महाजन हे नेहमीच सामाजिक कामाला प्राधान्य देतात.आजतागायत अनेक उपक्रम राबविले आहेत.
आजच्या धावपळीच्या जीवनात वधूवरांना सुयोग्य अनुरूप स्थळ मिळत नाही.त्यांचा वेळ ,पैसा, त्यांची चिंता,त्यांचा मानसिक ताण तणाव दूर व्हावा यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्यासाठी ज्या ज्या वधू – वरांनी,पालकांनी नावे नोंदवली असेल अशा सर्व पालकांनी वधू-वरांनी कार्यस्थळी उपस्थित राहावे. तसेच ज्या ज्या समाजधुरिणांनी मेळाव्यासाठी योगदान दिले आहे अशा सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य एस .टी . चौधरी, प्राचार्य बी .बी .महाजन , प्राचार्य बी . एच . जाधव ,प्रा. अनिल बोरसे, प्राचार्य आर. आर .वाघ , प्राचार्य व्ही .बी . पाटील .,श्री कैलास पाटील , श्री लक्ष्मण बागुल, श्री बापू माळी , श्री एकनाथ दौलत माळी, श्री सुमित चौधरी,श्री.महेंद्र जगताप सर आदींनी आवाहन केले आहे.

