1 min read

राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजातर्फे कवी रमेश पवार व गोपाल हडपे सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार.

Loading

अमळनेर – राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाजातर्फे कवी रमेश पवार व गोपाल हडपे सर यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार. अमळनेर येथील आदरणीय कविवर्य बापूसाहेब रमेश पवार यांना नुकताच यवतमाळ येथे पडझड गाव गाड्यांच्या संदर्भ काव्यसंग्रहाला व साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना लता रामटेके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे सामाजिक व शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कामगिरीमुळे गोपाल हडपे सर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल अमळनेर येथील राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठान व धनगर समाज बांधवांतर्फे शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष अण्णासाहेब बन्सीलाल भागवत होते. यावेळी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष आबासाहेब नितीन निळे व प्रतिष्ठानचे सचिव एस सी तेले सर यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांनी धनगर समाजामध्ये असे प्रतिभावान व गुणवंत व्यक्ती निर्माणाने समाजाची प्रतिष्ठा व उंची वाढते .यापुढे समारंभापूर्वक सत्कार सोहळे करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश भलकार सर यांनी केले व आभार समाधान भाऊ धनगर यांनी केले .या कार्यक्रमाला अण्णासाहेब बन्सीलाल भागवत, आबासाहेब नितीन निळे, एस सी तेले सर, समाधान भाऊ धनगर ,गोविंद बापू कंखरे, आबासो मच्छिंद्र लांडगे, नानासो प्रभाकर लांडगे, प्रदीप भाऊ कंखरे, प्रा. दिनेश भलकार ,चेतन भाऊ देवरे,बापूसो अरुण बागुल, पवन लांडगे ,संजय शिरसाट ,झटकार साहेब, मनोज मोरे, आकाश मनोरे, तुषार इदे ,विकास सूर्यवंशी व समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *