1 min read

कळमसरे ता. अमळनेर येथे ऊस तोडी करणाऱ्या बंजारा बांधवांनी सेवालाल महाराजांची जयंती केली उत्साहात साजरी ….

Loading

कळमसरे तालुका अमळनेर येथे ऊस तोडी करणाऱ्या बंजारा बांधवांनी सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली.बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रथम प्रतिमेचे पूजन वि.का.सोसायटीचे मा.चेअरमन बापुसो भिकेसिंग जतनसिंग पाटील यांनी केले.ऊस तोड कामगाराचे प्रमुख (मुकादम)एकनाथ ताराचंद राठोड यांनी संत श्री सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला नैवेद्य दाखवून प्रार्थना केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.व्ही.पी.महाजन यांनी केले. शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील शिक्षक श्री आर.जी.राठोड यांनी
संत सेवालाल महाराजांचा संपूर्ण इतिहास वर्णन करून सांगितला.त्या प्रसंगी कळमसरे गावातील लोकप्रिय सरपंच भाऊसाहेब जगदीश भाईदास निकम, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक प्रदेशअध्यक्ष मुरलीधर राजाराम महाजन,रविंद्र(भैय्या) महाजन व बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन एकनाथ ताराचंद राठोड व त्यांच्या सर्व सहकार्याने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *