1 min read

सदृढ आरोग्यासाठी विविध हेल्थ कॅम्पचे आयोजन

Loading

सदृढ आरोग्यासाठी विविध हेल्थ कॅम्पचे आयोजन

उरुळीकांचन(प्रतिनिधी): सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र ह्यांच्या वतीने येथे सार्वजनिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन येथे करण्यात आले.डॉ रविन्द्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरुळी कांचन येथे सदृढआरोग्यासाठी व प्रतिबंधात्मक उपचारासाठी वरील शिबिर संपन्न झाले. ह्या शिबिराचे उद्घाटन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक ट्रस्टी सल्लागार डॉ रविन्द्र भोळे ह्यांचे हस्ते करण्यात आले. ह्या शिबिरात विनामूल्य आरोग्य तपासणी, रक्ताच्या तपासण्या रक्तातील साखर,सिबिसी, हिमोग्लोबिन, लिव्हर फंक्शन टेस्ट व इतर तपासण्या करण्यासाठीं रक्ताचे नमुने घेण्यात आले. ह्याच कार्यक्रमांतर्गत आरोग्य विषयक महत्वपुर्ण आभा कार्ड कॅम्पही घेण्यात येऊन दोनशे जणांचे आभा कार्ड काढण्यात आले. डॉ रविन्द्र भोळे, शिवानी नितीन म्हस्के समुदाय आरोग्य अधिकारी, श्री अतुल गाढवे आरोग्यसेवक, श्रीम सीमा चव्हान आशा कार्यकर्ते, श्रीम अश्विनी वाबळे आशा कार्यकर्त्या ह्यांनी वरील आरोग्यविषयक उपक्रम राबविला. ह्या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत सदस्या स्वप्निशा आदित्य कांचन, परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. डॉ रविंद्र भोळे आरोग्यसेवा यापूर्वीही अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबविले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *