प्रा.श्री.अतुल इंगळे यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान.
![]()

प्रा.श्री.अतुल इंगळे यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. प्रदान.
जळगाव: के.सी.ई. सोसायटी संचलित मू.जे.(स्वायत्त) महाविद्यालयाचे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय,जळगाव येथील इंग्रजी विषयाचे जेष्ठ शिक्षक प्रा.श्री.अतुल इंगळे यांना कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आज
इंग्रजी विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली.त्यांनी Reflection of Women Subordination and Women Empowerment in selected novels of Shashi Deshpande and Manju Kapur या विषयावर प्रबंध सादर केला. त्यांना नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. इंदिरा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे,प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे,उपप्राचार्य श्रीमती.के.जी.सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.श्री. आर.बी. ठाकरे, तिन्ही विद्याशाखा समन्वयक प्रा.सौ.स्वाती बऱ्हाटे, प्रा.श्री.उमेश पाटील प्रा.श्री.प्रसाद देसाई व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

