सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व मा.उपनगराध्यक्ष विनोदभाऊ लांबोळे…
![]()


सामाजिक बांधिलकी जोपासणारे नेतृत्व मा.उपनगराध्यक्ष विनोदभाऊ लांबोळे…
कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात, तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा ,काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळ झाडे लावा, आणि पिढ्यांसाठी तरतूद करायची असेल तर माणसं पेरा…!
विनोद भाऊंनी उभ्या आयुष्यात हेच काम अविरतपणे चालू ठेवले आहे, सर्व क्षेत्रात भाऊंनी मित्र जोडण्याचे काम केले, एवढेच नव्हे तर मैत्री जपण्याचे काम केले, लहान मोठा असा भेदभाव न ठेवता आपल्या परीने सर्वांना मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव…
अमळनेर नगर परिषदेमध्ये नगरसेवक व उपनगराध्यक्ष असतांना आपल्या प्रभागातील सामाजिक कामांना प्रधान्य देऊन मतदारांच्या हृदयामध्ये आपलं वेगळ्याच ठसा उलटला आहे. भाऊंनी यापूर्वी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले आहेत दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवली आहे.. आता नुकताच त्यांच्या प्रभागामध्ये अनेक विकास कामांचे उद्घाटन करून भाऊंनी सामाजिक कामाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. आपल्या प्रभागाचा विकास साठी ते सदैव कटिबद्ध असतात. माजी आमदार साहेबराव दादा पाटील असो विद्यमान आमदार अनिलदादा पाटील असो यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामासाठी व प्रभागाच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी भाऊ नेहमीच यशस्वी ठरले आहेत हे तेवढेच सत्य..
आज विनोद भाऊ यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्यासाठी दोन शब्द
प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
शब्द संकलन
ईश्वर महाजन पत्रकार अमळनेर

