चाळीसगाव येथील भूजल अभियान टिमचा बिड जिल्ह्यातील मानवलोक,आंबेजोगाईचा दुसऱ्या टप्प्यातील अभ्यास दौरा संपन्न.
![]()

चाळीसगाव येथील भूजल अभियान टिमचा बिड जिल्ह्यातील मानवलोक,आंबेजोगाईचा दुसऱ्या टप्प्यातील अभ्यास दौरा संपन्न.
चाळीसगाव
तालुक्यात जलसंधारण व पर्यावरण रक्षणावर काम करत असलेल्या सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प, भूजल अभियान टिमचा दुसऱ्या टप्प्यातील जलसंधारण,पर्यावरण तसेच मृदसंधारण कामांचा अभ्यास दौरा नुकताच संपन्न झाला.
बिड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यात अनिकेतजी लोहीया यांचे मार्गदर्शनाखाली तीस ते चाळीस गावांमध्ये कामाच्या वेळा, जलसंधारण व पर्यावरण रक्षणावर लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत.या पैकी अनेक प्रकल्पांना टिमच्या माध्यमातून भेटी देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने सात एकर क्षेत्रावरील मियावाकी पध्दतीचे वृक्षारोपण, नदी खोलीकरण रुंदीकरण,केअरिंग फेंड्सच्या मदतीने सुरु असलेले वयोवृध्दांसाठीचे किचन, शिस्त कामाचे नियोजन,वक्तशीरपण या गोष्टी मानवलोककडून आवर्जून पाहिल्यात आणि शिकलोत.
गावा गावात झालेली जल संधारण कामे असतील, शेतकऱ्यांसाठी फळ बागा असतील, अत्यंत सुंदर FPC कंपनी असेल, नैसर्गिक शेतीसाठी प्रयत्न,छोटे छोटे वॉटर शेड, माती आणि पाण्यासाठी राबवलेली अनेक उपक्रम हे खरंच पाहण्यासारखी होती.
सहभागी भूजल वारकऱ्यांची मानवलोकच्या निसर्गरम्य ठिकाणी निवासाची व भोजनाची सोय करण्यात आली होती.
मानवलोकचे अनिकेतजी लोहिया तसेच लालाजी यांचे तसेच त्यांच्या टिमचे यासाठी मार्गदर्शन लाभले.या अभ्यास दौऱ्याचे आयोजन सेवा सहयोगचे महेशजी चव्हाण व गुणवंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून करण्यात आले होते.
यामध्ये सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भूजल अभियान टिमचे भूजल वारकरी सहभागी झाले होते.

