1 min read

ब्राह्मणवेल शाळेची राज्यस्तरावर निवड

Loading

ब्राह्मणवेल शाळेची राज्यस्तरावर निवड

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
साक्री तालुक्यातील माळमाथा विभागातील जीवन ज्योती फुले एज्युकेशन सोसायटी ब्राह्मणवेल संचलित कै बळीराम
दादा माध्यमिक विद्यालयातून
विज्ञान व तंत्रज्ञान विभाग नवी दिल्ली आणि शिक्षण विभाग माध्यमिक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने
सन 2022 -23 या साली इन्स्पायर अवार्ड विज्ञान नामांकन स्पर्धा घेण्यात आली .धुळे जिल्ह्यातून एकूण ३३
शाळांनी सहभाग घेतला .
तिचा निकाल जाहीर झाला असून
आमच्या शाळेची इयत्ता . १० वी ची विद्यार्थिनी कु . करिना दिलीप साबळे ( नागझिरी )हिची धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला आहे .आणि तिची निवड “राज्यस्तरावर ” करण्यात आलेली आहे . या स्पर्धेत
नवनवीन कल्पना ‘ संकल्पना ‘ उपक्रम ‘प्रकल्प याची निवड
केली जाते . तिचे”गाळणी यंत्र ” या उपकरणाचीऑनलाइन स्पर्धा घेण्यात येवून या स्पर्धेतून “प्रथम क्रमांक “मिळाला आहे . तिचे
सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे . तिला विज्ञान शिक्षक श्री .
काशिनाथ माळी यांचे मार्गदर्शन लाभले . तिचेअभिनंदन
माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे श्री मोहन देसले साहेब ,
विज्ञानपर्यवेक्षक श्री सुधाकर बागुल ,मुख्याधपक संघाचे अध्यक्ष श्री . आर व्ही पाटील ‘ संस्थाध्यक्ष श्री . तुकाराम महाजन ‘ संस्था सचिव श्री . एकनाथ माळी ‘ मुख्या . श्री . गणेश माळी सह सर्वांनी अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *