स्वयं सिद्धि कॉलेज भिवंडी येथे रुपांतरण आंतर महाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा हर्षोल्लासने संपन्न
![]()


स्वयं सिद्धि कॉलेज भिवंडी येथे रुपांतरण आंतर महाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धा हर्षोल्लासने संपन्न
मुंबई ठाणे ( मनिलाल शिंपी ):स्वयं सिद्धि मित्र संघ डिग्री कॉलेज भिवंडी च्या वतीने रुपांतरण ह्या आंतर महाविद्यालयीन क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये 24 महाविद्यालयातील 1400 विद्यार्थ्यानी विविध 21 स्पर्धांत सहभाग नोंदविला.
रुपांतरण चे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे प्र कुलगुरु डॉ अजय भामरे ह्यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी बोलताना डॉ भामरे यांनी सांगितले की प्रत्येक विद्यार्थ्यानी आपल्या आवडीच्या विषयात पारंगत होऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना ह्याचा कसा फायदा होईल हे नमूद केले. याप्रसंगी फ्लेअर कंपनी चे अध्यक्ष के. जे. राठोड, विमलचंद राठोड व अजय शेट्टी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख विश्वस्त सी ए सुरेश जैन तसेच रूषभ जैन उपस्थित होते. परिसरातील अनेक प्राचार्य व प्राध्यापकांनी हजेरी लावली.
रुपांतरण च्या समारोप प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री श्री कपिल पाटील ह्यांची उपस्थिती ने व साधलेल्या संवादामुळे सर्व विद्यार्थ्यांमधे चेतना निर्माण झाली. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की संपत्ती वारसा हक्काने मिळू शकते पण आपली ओळख निर्माण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व संघर्ष अटळ आहे.
ह्या प्रसंगी भिवंडी शहरातील विविध मान्यवर श्री बाळाराम चौधरी श्री मदन बुवा नाईक श्री सुंदर नाईक श्री सुमित पाटील श्री रोहित चौधरी श्री मनोज गूळवी, विश्वस्त सीए सुरेश जैन, ऋषभ जैन उपस्थित होते. प्राचार्य महेश सोनी यांनी प्रास्ताविक केले आणि महाविद्यालयाची प्रगती व विविध उपक्रमांची माहिती दिली.
प्रा. योगेश पवार व प्रा. भावना खैरनार यांनी संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. व रुपांतरण च्या समन्वयक प्रा. शिवानी सिंग यांनी उपस्थीत मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

