1 min read

रमाईच्या त्यागातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज.
मुकुंद सपकाळे

Loading

रमाईच्या त्यागातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज.
मुकुंद सपकाळे

आपल्या जगण्याने समाज व्यवस्थेची जडणघडण होत असेल आपल्या त्यागातून मानवी समाज व्यवस्था एक समृद्ध अशी वाट निर्माण करत असेल आणि माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त होत असेल तर ती व्यक्ती ते जगणं सर्वार्थान मानवी समूहाला प्रेरणादायक आणि जगण्याला अर्थपूर्ण करणार असते असं जगणं माता रमाई आपल्या जीवनभर जगल्यात आणि त्या जगण्यातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखा ज्ञानवंत, प्रज्ञावंत, विचारवंत पुरुष भारतीय समाज व्यवस्थेला प्राप्त झाला हे विसरता येणार नाही असे उद्गार महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद भाऊ सपकाळे यांनी भीमरमाई प्रतिष्ठान आयोजित आई रमाई जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद बागुल होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी आई रमाई यांनी आपल्या त्यागातून इतिहास निर्माण केला त्या इतिहासाची पान अवलोकन करताना आपल्या सुखमय जगण्याला त्यागाची आणि समर्पणाची जोड देण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. विचार मंचावर डी. एम. अडकमोल इंदिरा जाधव,सचिव प्रा. डॉ. सत्यजित साळवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आई रमाईच्या प्रतिमेला विजयकुमार मौर्य, सुनील सोनवणे, अनिल सुरडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी केले.कवी गोविंद पाटील, कवयित्री इंदिरा जाधव, डी. एम.अडकमोल यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी तर आभार विजय लुल्हे यांनी मानले. कार्यक्रमास प्रा.डॉ.प्रदीप सुरवाडकर, वाल्मीक सपकाळे, हेमंत बिराडे रमेश सोनवणे, विश्वास करंदीकर, महेंद्र केदार उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *