राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार :-
![]()

राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार :-
🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️🏃🏻♂️
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व बिहार ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान पटणा बिहार येथे आयोजित आंतरजिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या खेळाडूंचा सत्कार शारीरिक शिक्षण महाविद्यालयात जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार्थी डॉ.नारायण खडके यांचे हस्ते करण्यात आला याप्रसंगी राजेश जाधव, डॉ विजय पाटील, प्रा ईकबाल मिर्झा, प्रशांत कोल्हे, बन्सीआप्पा माळी, योगेश सोनवणे, धिरज जावळे, पंकज वराडे यांची उपस्थिती होती. निवड झालेले खेळाडू याप्रमाणे- पार्थ संजय जोगी ट्राँयथलाँन ग्रुप A, गोपाल रवींद्र न्हायदे ट्राँयथलाँन ग्रुप A, आयुष विलास पाटील ट्राँयथलाँन ग्रुप C, तन्मय देवनन सोनवणे ८० मीटर धावणे, सुधाकर विजय पाटील ८० मीटर धावणे, गिरीश जगदीश कुलकर्णी ६०० मीटर धावणे, शुभम तुळशीराम गोपाल ६०० मीटर धावणे, चेतन गणेश सोनवणे लांबउडी, यश ज्ञानेश्वर बारी लांबउडी, अर्पित पवनकुमार जाडीया गोळाफेक, कृष्णा बाळासाहेब गवळी गोळाफेक, आर्यन दीपक बिऱ्हाडे भालाफेक.
संघ व्यवस्थापक म्हणून पंकज वराडे तर संघप्रशिक्षक म्हणून धिरज जावळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

