1 min read

डोळखांब, मांजरे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हात जोडो अभियान

Loading

डोळखांब, मांजरे जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे हात जोडो अभियान

ठाणे,शहापूर – ( मनिलाल शिंपी)
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा विस्तारित कार्यक्रम म्हणून काँग्रेसने हात से हात जोडो अभियान सुरू केले असून काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे व तालुका अध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील अभियान सुरू झाले असून आज डोळखांब व मांजरे जिल्हा परिषद गटातील डोळ खांब,रानविहिर, मांजरे या तीन ग्रामपंचायत मध्ये हात से हात जोडो अभियान राबविण्यात आले.
डोळखांब येथे गावदेवी मंदिरात नारळ वाढवून शहरात पदयात्रा काढण्यात आली.तसेच रानविहिर, अवळपाडा,निभळपाडा येथे पत्रके वाटण्यात आली. डोळखांब नाक्यावर पदयात्रा संपून कॉर्नर सभा घेण्यात आली.यावेळी जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, तालुका अध्यक्ष महेश धानके,अभियान निरीक्षक परशुराम पितांबरे,महिला तालुका अध्यक्षा संध्याताई पाटेकर,रोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष शैलेश अधिकारी यांनी आपल्या भाषणातून राहुल गांधी यांचा संदेश सांगून देशात निर्माण झालेल्या अराजकता व वाढत्या महागाई आणि बेरोजगारीवरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परटोले,जितेश विशे यांनी केले.
कार्यक्रमास अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष असिफ शेख,आदिवासी आघाडी जिल्हा अध्यक्ष दत्ता बरोरा, भारत यात्री संतोष ढोन्नर, युवक अध्यक्ष अंकुश भोईर,दशरथ तारमले,लक्ष्मण निचिते,संतोष मुकणे,महेंद्र आरज,यशवंत विशे,झिपा वीर,योगेश वीर,राम वाघ,रमेश ठाकरे,तानाजी भगत,दत्तू झुगरे, जयवंत आरज,वाळकू पोकळा,भगवान हिंदोळा,रामदास भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *