1 min read

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या इयत्ता नववीच्या मुलींचा झाला गौरव

Loading

नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीच्या इयत्ता नववीच्या मुलींचा झाला गौरव

महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरा करण्यात येत आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेमध्ये पारंबी विद्यालयाच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने पारितोषिक मिळून क्रमांक पटकावला यामध्ये कु. अनुजा संतोष गावंडे, कु. सपना अनिल पाटील, कु. साक्षी रमेश मुके कुमारी तेजल बाळू गावंडे, कु. गायत्री गणेश कोळी, कु. प्रतीक्षा गुलाबराव दाणे आदी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा हिवरा येथे नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी सर्व विद्यार्थिनींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून प्रथम क्रमांकाचे रांगोळी मध्ये 501 रुपयाचे सामूहिक पारितोषिक सुद्धा सन्मानाने श्री अभिनव माळी तालुका कृषी अधिकारी मुक्ताईनगर यांच्या हस्ते विद्यार्थिनींना पारितोषिक व रोख रक्कम प्रदान करण्यात आले. प्रसंगी मंडळ कृषी अधिकारी, कु-हा श्री नितीन पगार , श्री प्रकाश पाटील श्री मुरलीधर पाटील श्री दुर्योधन पाटील श्री बाळ रूपचंद पाटील आदी मान्यवर गावकरी या कार्यक्रमास उपस्थित होते तसेच गावातील महिला तसेच शाळकरी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थिनींना येथील कृषी सहाय्यक श्रीमती अर्चना इंगळे यांनी मार्गदर्शन केले. नवीन माध्यमिक विद्यालय पारंबीचे मुख्याध्यापक श्री एस. डी. पाटील इयत्ता नववीचे वर्गशिक्षक तथा ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर आर. पी. राठोड श्री सुनील पाटील तसेच शिक्षकेतर श्री रघुनाथ इंगळे श्री विनायक इंगळे आदींनी या मुलींचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *