1 min read

कोकण जिंकलं आता मुंबईपण जिंकणार- अनिल बोरनारे

Loading

कोकण जिंकलं आता मुंबईपण जिंकणार- अनिल बोरनारे

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

नवी मुंबई (प्रतिनिधो) कोकण विभाग शिक्षक मतदार संघात भाजपा व बाळासाहेबांची शिवसेना आणि सहकारी शिक्षक संघटनेचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय संपादन केला असून पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई शिक्षक मतदारसंघात दणदणीत विजय संपादन करू असा आत्मविश्वास भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक व मुंबई मराठी अध्यापक संघाचे कार्यवाह अनिल बोरनारे यांनी व्यक्त केला आहे
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी बाळाराम पाटील यांच्यावर विजय प्राप्त केला. मुंबईतील शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी शिक्षक असलेला प्रतिनिधी विधानपरिषदेत पाठविण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न, विलंबाने होणारे वेतन, मेडिकल बिले, सेवानिवृत्ती नंतर मिळणारे पेन्शन यामध्ये दप्तर दिरंगाई होत असून याबाबत शासन दरबारी आवाज उठविणार असल्याचे अनिल बोरनारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *