1 min read

पद्मश्री अण्णासाहेब जाधव माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, राजेंद्र शिंदे यांना मातृशोक!

Loading

पद्मश्री अण्णासाहेब जाधव माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, राजेंद्र शिंदे यांना मातृशोक!

ठाणे::(प्रतिनिधी):नंदुरबार जिल्ह्यातील, व नंदुरबार येथीलच रहिवाशी असलेले, पद्मश्री अण्णासाहेब जाधव माध्यमिक विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, राजेंद्र एस.शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती सोजाबाई शेणपडू शिंदे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने भिवंडी येथे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी चंदनबाग कामतघर येथे करण्यात आला. त्यांच्या दुःखात पद्मश्री अण्णासाहेब जाधव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक ,कर्मचारी वर्ग, व विद्यार्थी सहभागी आहेत, त्याचप्रमाणे दैनिक स्वराज्य तोरण परिवार, मानव सेवा हीच ईश्वर सेवा ग्रुप व आर एस पी युनिट ठाणे कल्याण !
आई म्हणजे प्रेमाचं आगर,स्नेहाचा सागर आणि करुणेचा महासागर…!
परमेश्वराला प्रत्येक घरात जाता आलं नाही म्हणून परमेश्वराने आई निर्माण केली.वात्सल्यसिंधू प्रेमस्वरुप आई.तिची महती आणि महिमा काय वर्णावा ? आईच्या रुपाने कुटुंबाचा संस्कारवड आणि आधारवड कोसळला आणि संपुर्ण शिंदे कुटुंब आकस्मिकपणे दु:ख सागरात बुडालं.संस्कार, शिकवण व अनुभवी या विद्यापीठास शिंदे कुटुंबिय मुकले. हा आघात पचविण्याची शक्ती या शिंदे कुटूंबियांना लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील आणि मानव सेवा हीच ईश्वरसेवा या ग्रुपचे प्रमुख, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांनी ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी युनिट चे माजी अतिरिक्त कमांडर श्री.राजेंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वन केले. मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.स्वर्गीय सोजबाई यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना केली.
तसेच विद्यालयाच्या सर्व शिक्षकवृंद यांच्याकडून स्वर्गीय सोजबाई शिंदे यांना भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *