1 min read

देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

Loading

त्र्यंबक रणदिवे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा

अमळनेर प्रतिनिधी- जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक रणदिवे नुकतेच 37 वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झाले त्यांनी त्याआधी सात्री, बोहरे, रढावण नंदगाव, कोळपिंप्री, देवगाव देवळी या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेमध्ये ते सेवानिवृत्त झाले.
अत्यंत मितभाषी व आपल्या कार्याला नेहमीच प्रथम प्राधान्य देत इमाने ईतबारे त्यांनी सेवा केल्याचा त्यांना आज मनस्वी आनंद आहे व नगाव गड खांब केंद्रातून अनेक बांधव भगिनींनी त्यांना शुभेच्छा दिल्या. गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी सेवापूर्ती निमित्ताने भावी वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
जिल्हा परिषद शाळा देवगांव देवळी येथे त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्यावेळी सत्कार प्रसंगी देवगाव देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन,केंद्रप्रमुखश्री राजेंद्र गवते श्री ज्ञानेश्वर पाटील, शिक्षक संजय पाटील,संजय जगताप,प्रविण पाटील ,श्रीनिवास सोनवणे ,श्रीमती तेलंग मॕडम .शिक्षक -आरविंद सोनवणे,राजेंद्र पाटील,रमेश पाटील, दिपक सोनवणे,सौ रेखा सोनवणे ,श्रीमती सरिता जाधव,श्रीमती कल्पना साळुंखे,देवगाव देवळी हायस्कूलचे शिक्षक आय आर महाजन, एस के महाजन,एच.ओ.माळी अरविंद सोनटक्के,मित्र परिवारांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *