1 min read

मुंबई माळी समाज मंडळाचा संक्रांत मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न….

Loading

मुंबई माळी समाज मंडळाचा संक्रांत मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न….

श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,मुंबई यांचा संक्रांत मेळावा कल्याण येथील सेंट्रल रेल्वे इन्स्टिट्यूट हॉल येथे दि.२९ जानेवारी २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मंडळाचे विश्वस्त श्री. निळकंठ देवचंद महाजन व श्री. दंगल गंगाराम माळी तसेच प्रमुख पाहुणे श्री. सुरेश भिला महाजन उपाध्यक्ष क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ (महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात) व श्री. लक्ष्मण बळीराम माळी माजी अध्यक्ष माळी समाज मंडळ मुंबई, मंडळाचे विद्यमान अध्यक्ष डॉ.प्रा.प्रकाश माळी सर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. प्रकाश माधवराव महाजन, सचिव श्री. हरिलाल खुनेपिंपरे, सहसचिव प्रा.सुनिल महाजन, खजिनदार प्रा. भागवत शेलकर, माजी अध्यक्ष श्री. दिलीप माळी, कार्यकारी सदस्य, मोठया मंडळाच्या सदस्या सौ. रत्ना माळी, महिला मंडळ अध्यक्षा सौ. पुष्पा महाजन व नवयुवक मंडळ अध्यक्ष रमाकांत महाजन उपस्थित होते. कु. नम्रता माळी व कु. रोशनी माळी यांनी ईशस्तवन सादर करून स्वागत गीताने सर्वांचे स्वागत केले.
या मेळाव्यात लहान मुलामुलींसाठी चित्र रंगविणे, गीत गायन, नृत्य व बुद्धिमत्ता चाचणी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांसाठी अशोक महाजन, वासुदेव राजकुळे, सौ.नेहा शेलकर, कु.भाग्यश्री महाजन, प्रा.नितीन मगरे, अभिनेता विकास महाजन व सौ. वैभवी महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रा. हेमचंद्र दहिवदकर यांनी वधू-वर परिचय सत्राचे आयोजन उत्तम प्रकारे केले.
या मेळाव्यातील सकाळच्या सत्रात सेवानिवृत्त समाज बांधवांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच मुंबई परिसरातील व गावाकडील कर्तृत्ववान समाज बंधू-भगिनींचा देखील सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री. आनंदराव आत्माराम महाजन यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने न्यायाधीश म्हणून निवड झाल्याबद्दल मुंबई माळी समाज मंडळाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
सायंकाळच्या सत्रात सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना व विविध स्पर्धातील विजेत्यांना प्रमुख पाहुणे श्री. लक्ष्मण बळीराम माळी व श्री. सुरेश भिला महाजन, विश्वस्त श्री.निळकंठ महाजन व श्री.दंगल माळी, मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा.प्रकाश माळी सर, उपाध्यक्ष श्री.प्रकाश महाजन, माजी अध्यक्ष श्री.दिलीप माळी, नवनिर्वाचित महिला मंडळ अध्यक्षा सौ.रेखा महाजन व नवयुवक मंडळ अध्यक्ष रुपेश महाजन तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारी सदस्य यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. या विविध रंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरिलाल खुनेपिंपरे, प्रा.भागवत शेलकर, प्रा.सुनिल महाजन, दिपक माळी, शशिकांत महाजन व युवराज मगरे यांनी केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद द्वारा प्रसिध्द करण्यात आलेली अहिराणी दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व मान्यवर, मुंबई माळी समाज मंडळाचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकारी सदस्य, महिला मंडळ, नवयुवक मंडळ यांच्यासह माजी पदाधिकारी चिंतामण महाजन, प्रा.राजेंद्र चव्हाण आणि सर्व समाज बंधू-भगिनींनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. या मेळाव्यासाठी मुंबई,पालघर,ठाणे,रायगड, पुणे,नाशिक,जळगांव,धुळे, नंदुरबार,मध्य प्रदेश व गुजरात येथून समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *