1 min read

शिक्षकांच्या कर्तृत्वाची असल प्रतिमा विद्यार्थ्यांच्या कला साधनेत सापडते

Loading

शिक्षकांच्या कर्तृत्वाची असल प्रतिमा विद्यार्थ्यांच्या कला साधनेत सापडते

” शिक्षकांच्या कर्तृत्वाची अस्सल प्रतिमा विद्यार्थ्यांच्या कलासाधनेत सापडते. विद्यार्थी गुणवत्तेने कलाक्षेत्रात मोठा झाला की आपसूक शिकण घेतलेल्या संस्थांचा व शिक्षकांचा नावलौकीक वाढतो याचा प्रत्यय मला प्राचार्य राजेंद्र महाजन सरांच्या उत्तुंग कार्यातून दिसून आला ” असे मार्मिक प्रतिपादन माजी कला संचालक प्राध्यापक विश्वनाथ साबळे ( महाराष्ट्र राज्य मुंबई ) यांनी केले.ललित कला केंद्र चोपडा महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन सर यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ ” प्रति कृतज्ञता सोहळा ” दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी माजी विद्यार्थी आयोजित महिला मंडळ विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृह चोपडा येथे जल्लोषात संपन्न झाला त्याप्रसंगी ते बोलत होते.
उद्योगपती आशिषभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य राजेंद्र महाजन २०२३ अखेर निवृत्त होत आहे त्यांच्या सन्मानार्थ माजी विद्यार्थी महासंघातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.विचार मंचावर निरोपार्थी प्राचार्य राजेंद्र महाजन,धर्मपत्नी सौ.माधुरी महाजन , प्राध्यापक विश्वनाथ साबळे ( माजी कला संचालक ,म.रा.मुंबई भास्करराव तिखे ( माजी निरीक्षक चित्र व शिल्प म.रा.मुंबई ),एस.डी.भिरुड ( सरचिटणीस,अ.म.रा.शै.कलाशिक्षक संघ ),सुरेंद्र जगताप (अध्यक्ष महाकॅटना, मुंबई ),भगिनी मंडळ अध्यक्षा सौ.पुनमबेन गुजराथी, उपाध्यक्षा सौ.छायाबेन गुजराथी,सहसचिव सौ. आश्विनीबेन गुजराथी, उद्योगपती आशिषभाई गुजराथी,अशोक तांबटकर,माजी प्राचार्य किरण तायडे ( खामगाव ), ज्ञानेश्वर मारोतकर (अकोला ),माजी प्राचार्य भरत गढरी प्राचार्य अतुल मालखेडे,रविंद्र साबळे, जितेंद्र सुरळकर , शिवचित्रकार मिलिंद विचारे,जळगाव कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन.ओ.चौधरी,भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीचे संस्थापक विजय लुल्हे ,मुख्याध्यापक प्रल्हाद सोनार मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची क्षणचित्रे * आगमनावेळी सत्कारार्थींचे फुलांची उधळण करून स्वागत व सपत्नीक औक्षण

  • प्रवेशद्वाराजवळ प्राचार्यांचे
    मनोवेधक कलाशिक्षक आर.टी.सोनवणे यांचे खडू रेखाटन
  • उपस्थितांचे डी.के.माळी रेखांकित पत्रिकेने स्वागत
  • प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे समग्र चित्र कलाप्रदर्शन
  • लोकलक्ष साप्ताहिकाच्या राजेंद्र महाजन गौरव विशेषांकाचे कार्यकारी संपादक योगेश पाटील व लेखकांच्या उपस्थितीत प्राचार्य महाजनांच्या हस्ते विचारमंचावर प्रकाशन
  • भव्य पडद्यावर सरांच्या कला जीवनातील चित्रफितीचे प्रसारण
  • निरंजन शेलार लिखित मानपत्राचे जाहिर वाचन
  • राजेंद्र जावळे लिखित गौरवपर कवितेचे एलईडी प्रकाशन व वाचन
  • माजी विद्यार्थी महासंघातर्फे सुग्रास भोजन
    प्रारंभी स्वर्गीय संस्थापक संस्थाध्यक्षा डॉ.सुशिलाबेन शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण उद्योजक आशिष गुजराथी व मान्यवरांनी केले.प्रारंभी माजी कला संचालक यांच्या हस्ते प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थीदशेपासून आजतागायत केलेल्या भव्य कॅनव्हास पेंटीग ,काम्पोजिशन, रेखाचित्रे पाहून संस्थाध्यक्ष पुनमबेन गुजराथी व मान्यवर भारावून गेले.सुप्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार निरंजन शेलार व सहकारी राजेंद्र जावळे यांनी निरोपार्थी गुरुवर्य राजेंद्र महाजन सरांच्या गौरवार्थ स्व लिखित कविता वाचन करून सर्वांची मने जिंकली.माजी विद्यार्थी महासंघातर्फे देय गुरुवर्य महाजन सरांच्या गौरवपत्राचे मानपत्र वाचन कलाशिक्षक संजय बारी यांनी केले. कलाध्यापक संघाचे राज्य सरचिटणीस एस.डी भिरुड मार्गदर्शनात म्हणाले की,’ चोपडा तालुका आदिवासी बहुल असूनही निव्वळ कलाज्ञान न देता महाजन सरांनी विद्यार्थ्यांना सुजाण नागरिक बनवून आत्मबल दिले.उपक्रम व प्रदर्शनांच्या आयोजनांच्या निःस्वार्थी मार्गदर्शनातून जिल्ह्यात कलासंस्थांशी अतूट नाते केले म्हणूनच जिल्ह्यात कोणताही कार्यक्रम महाजन सरांशिवाय होऊ शकत नाही.अतुलनीय, अजातशत्रू वंदनीय व्यक्तिमत्व राजेंद्र महाजन सरांचे आहे.” शिवचित्रकार मिलिंद विचारे यांनी मनोगतात कृतज्ञतापूर्वक सांगितले की ‘ महाजन सरांचे मार्गदर्शन व निरंतर प्रोत्साहन मिळाले नसते तर हाडाचा शिक्षक ते आंतरराष्ट्रीय पातळीवर शिवचित्रकार म्हणून माझी स्वतंत्र ओळख आणि यश मला मिळवता आलेच नसते. ‘ आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त चित्रकार पिसर्वो यांनी कला प्रांतातील पितामह भिष्म म्हणून प्राचार्य महाजन यांचा गौरव करून विद्यार्थ्यामधील कलेची भुख भागविणारा जातिवंत शिक्षक म्हणून प्रशंसोद्गार काढले.निवृत्त प्रा.डि.जे.पाटील यांनी सरांचा समर्पित कार्यमग्नतेसह गुणगौरव करून निवृत्ती नंतर माझ्या मुलीला माधुरीला घरी पुरेसा वेळ द्यावा ही जाहिर प्रेमळ तंबी सासरे या नात्याने दिली ! प्राध्यापक सुरेंद्र जगताप यांनी कलाध्यापकांच्या संघटनेला महाजन सरांच्या प्रशासकीय अनुभव , कायदेशीर ज्ञान व निर्भय सत्यनिष्ठेचा कसा फायदा होतो हे विविध प्रसंगातून मैत्रिपूर्ण अरेतुरेच्या भाषेत सांगून सगळ्यांचे लक्ष वेधले ! अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना सुप्रसिद्ध उद्योजक आशिषभाई गुजराथी म्हणाले की, ‘ कलेमध्ये समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य आहे.एकच ध्यास विद्यार्थी विकास हे एकमेव ध्येयमहाजन सरांच्या यशस्वी कारकिर्दीचे मूलमंत्र आहे विद्यार्थ्यांची गुणवत्ताच नव्हे तर विविध राष्ट्रीय उपक्रमातून त्यांनी संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रात वाढविला माझे विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून त्यांना नोकरी शिवाय स्वतःच्यापायावर उभे राहण्याचे सामर्थ्य दिले.’

प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे सत्कारार्थी मनोगत
प्रारंभी आर्थिक विवंचनेत घालविलेले संघर्षाचे प्रसंग सांगताना महाजनांना अश्रू अनावर झाले ! श्रद्धेय बाबाजी परिवाराने दिलेले आशीर्वाद व स्नेह यामुळे माझ्या कर्तृत्वाचे सार्थक झाले.स्वर्गीय बाबाजींच्या प्रेमळ शिकवणीमुळे जीवनातील संघर्षाचे क्षण क्षणात निवळले. दिवंगत जीजी सुशिलाबेन यांनी संयमाचे धडे अन् संस्थेचे ध्येयधोरणे व कार्यवाही करताना प्रशासनाचा मूलमंत्र जिजींनी दिले श्रद्धेय अरुणभाईंनी राष्ट्रीय कार्य व सामाजिक योगदान कलेतून कसे जोपासावे याचे सातत्याने मार्गदर्शन केले.शिक्षकाने आजीव विद्यार्थी , कठोर व शिस्तप्रिय प्रशासक व प्रसंगी मातृपितृवत्सल कसे वागावे याचे संस्कार देणारे गुरुजन – मनोहर गुरुजी,प्रकाश तांबटकर,सी.एन.पाटील , दिलीप मेढे, भिडे सर, वामन चिंचोलकर ,अरविंद मोरे , रामटेके सर , वसंत सोनवणे यांनी दिलेले कलात्मक मूल्यशिक्षण सांगून कृतज्ञतापूर्वक गुलजनांना श्रद्धांजली दिली ! तसेच दिवंगत सहकार महर्षी अविनाश आचार्य यांचे हृद्य
मुल्याधिष्ठीत संस्कारांचे प्रसंग सांगितले.मातापिता व ज्येष्ठ बंधू ,अर्धांगिनी माधुरी यांनी तणावात दिलेली भावनिक साथ व सासरची मंडळी , आप्तेष्टांनी दिलेल्या प्रेमाची आवर्जून धावती उजळणीही त्यांनी मनोगतात करुन उपस्थितांची मने जिंकली ! शेवटी उपस्थित पालकांना त्यांनी विनम्र आवाहन केले की, ” मुलांना कलेची जाणीव देऊन त्यांच्यातली कलारसिकता रुजवा आणि वाढवा तसेच कलावंतांना प्रसंगी मानसन्मान व प्रतिष्ठा
दिली पाहीजे. निःस्वार्थी मनस्वी प्रतिसादात सृजनशील कलेची बीजं
वाढतात ! “
विविध क्षेत्रातील संघटनांतर्फे भावपूर्ण सत्कार

  • हिरकणी नवदृष्टी प्रतिष्ठान, पुणे * माजी विद्यार्थी महासंघ *अजिंठा कलाजागर समिती ,जळगाव * जिल्हा कलाध्यापक संघ जळगाव सह चोपडा व पारोळा संलग्न शाखा * आर्ट सोसायटी जळगाव * ए.व्हि.एफ. भुसावळ * भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी,जळगाव * महाराष्ट्र साहित्य परिषद , चोपडा

माजी विद्यार्थ्यांची अनोखी मुल्यात्मक गुरुदक्षिणा
आजचा गायचा १७० माजी विद्यार्थ्यांनी निरंजन शेलार प्रमोद महाजन व दत्तात्रय पाटील यांच्या नेतृत्वाने माजी विद्यार्थी महासंघाचे स्थापना करून लाडक्या गुरुवर्यांच्या सन्मानार्थ शिष्यवृत्ती देण्याची घोषणा जाहिर केली .
संबधित शिष्यवृत्तीललित कला केंद्र चोपडामहाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आर्थिक दुर्बल होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात येईल यासाठी विद्यार्थ्यांना अत्यावश्यक शैक्षणिक कला साहित्य तसेच परीक्षेसाठी फी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येईल असे समितीतर्फे जाहीर करण्यात आले.बहुतांशी शिष्यवृत्ती गुरूंच्या निधनानंतर दिल्या जातात मात्र गुरुवरांच्या निवृत्ती प्रित्यर्थ माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या या मानवंदनेला उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटाने कौतूक केले !
द्वितीय सत्रात माजी विद्यार्थ्यांचे कलागुण प्रात्यक्षिके :-
माजी विद्यार्थी महासंघातर्फे राज्यभरातून आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या कलागुण प्रदर्शनाचा कार्यक्रम प्राचार्य राजेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला .
गुणदर्शनात प्रारंभी शिलांबरी जमदाडे यांनी रिकाम्या खोक्यातून कबुतर काढण्या यांसह जादूचे विविध प्रयोग सादर केले . हवेत हात फिरवून त्यांनी अंगठी काढल्याने सारे अवाक झाले ! शिलांबरींनी अंगठी त्यांनी प्राचार्य महाजनांना सादर भेट दिली.आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशात कठपुतली बाहुली नृत्यांचा ( पपेट शो ) कार्यक्रम करणारे सुप्रसिद्ध कलावंत दिनेश साळुंखे यांनी कार्यक्रमात रंगत आणली तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार जितेंद्र सुरळकर उपाख्य पिसर्वो यांनी सृजनशैलीतून सत्कारार्थी प्राचार्य राजेंद्र महाजन सरांचे आकर्षक व बोलके पोट्रेट कॅनव्हास वर चित्रित करून दाद मिळविली !
कार्यक्रमाची प्रस्तावना दत्तात्रेय पाटील सूत्रसंचालन घनश्याम पाटील व आभार प्रदर्शन प्रकाश सूर्यवंशी यांनी केले.
निरोप समारंभास प्राचार्य निरोपार्थी महाजन सरांचे पिताश्री जगन्नाथ महाजन, मातोश्री मिरा महाजन, ज्येष्ठ बंधु नंदकुमार महाजन, कनिष्ठ बंधु रामदास महाजन सुपूत्र ओजस व सुपूत्री प्रियंका, सुभाष नेमाडे, उद्योजक ललित नेमाडे, यांसह पालघर जिल्हा कलाध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रफुल्ल घरत व विनय पाटील,भास्कर केळकर , कलाशिक्षक डि.के. माळी ( पालघर ),कलाग्रामचे संस्थापक चित्रकार श्याम कुमावत, सेवानिवृत्त कला शिक्षक सुधाकर गारमोडे,सुप्रसिद्ध साहित्यिक अशोक सोनवणे, कवी विलास पाटील,सुभाष पाटील,दत्तू गुरुजी कवी बी नाथ,सुप्रसिद्ध चित्रकार लेखक राजू बाविस्कर,पक्षीतज्ज्ञ प्रा.विक्रम पाटील ( फत्तेपूर ), नरेंद्र महाजन,विजय पाटील,सुशिल पाटील,विकास मल्हारा, विजय जैन,डॉ.प्रकाश लोमटे अशोक चौधरी,सुरेश पवार,महेंद्र पाटील सावरकरप्रेमी कलाशिक्षक वाय.आर. पाटील, ज्योती रायसिंग, मिनल पाटील, विजय पाटील यांसह महाजन सरांचे विद्यार्थी, कलाप्रेमी आप्तेष्ट बहुसंख्येने उपस्थित होते.ईशस्तवन गान स्नेहल नागपुरे – पवार व जागृती नेवे,दुलारी सुगंधी , शिलांबरी जमदाडे यांच्या गायनाने कार्यक्रमात सात्विक स्वरगंध पसरला.प्रास्ताविक निरंजन शेलार सुत्रसंचलन संजय बारी व आभार प्रदर्शन प्रमोद महाजन यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद महाजन, दत्तू पाटील, निरंजन शेलार , दत्तात्रेय पाटील,पंकज पाटील,घनःश्याम पाटील, चत्रभुज शिंदे,दिपक शिसोदिया अडावदकर, विनोद महाजन,ज्ञानेश्वर रायसिंग, अर्जून कोळी तसेच कला महाविद्यालयाचे कर्मचारी भगवान बारी ,अतुल अडावदकर , प्रवीण मानकरी यांनी अमूल्य परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *