1 min read

अडावद पोलीस स्टेशनचा अंमलदार लाच घेतांना एसीबीच्या जाळयात…

Loading


यशस्वी सापळा अहवाल
▶️ युनिट – जळगाव.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- ३२
रा.चोपडा , ता.चोपडा जि.जळगाव.
▶️ आलोसे-
१) योगेश संतोष गोसावी, वय-३५
पोलीस अंमलदार/ब.नं.१८४०, नेमणुक-अडावद पोलीस स्टेशन. (वर्ग-३)
रा.पोलीस वसाहत, शासकीय निवासस्थान, अडावद ता.चोपडा जि .जळगाव .
२) चंद्रकांत काशिनाथ कोळी, वय-३६, व्यवसाय-होममार्ड
रा.कोळीवाडा, अडावद ता.चोपडा जि .जळगाव .
▶️ लाचेची मागणी-
प्रथम ५,०००/-रू. व तडजोडीअंती ४,०००/-रु .
▶️ लाच स्विकारली- ४,००० रू
▶️ हस्तगत रक्कम- ,४,०००/ रू
▶️ लाचेची मागणी –
दि.२८/०१/२०२३
▶️ लाच स्वीकारली
दि.२८/०१/२०२३ रोजी
▶️ * लाचेचे कारण*
यातील तक्रारदार यांच्या स्वतःचे नावे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर असुन ते वाळू वाहतूकीचा व्यवसाय करतात. सदर ट्रॅक्टरने अडावद पोलीस स्टेशन हदीमध्ये तुला जर वाळू वाहतूक करायची असेल तर दरमहा आमचे साहेबांना ५०००/-रुपये द्यावे लागतील असे सांगुन तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडे आलोसे यांनी पंचासमक्ष ४०००/-रुपये लाचेची मागणी केली व सदर मागणी केलेली लाच रक्कम आलोसे क्रं.१ यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रं .२ यांनी अडावद पोलीस स्टेशनच्या आवारात आलोसे क्रं.१ व पंचासमक्ष स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.त्यांचे वर अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ सापळा व तपास अधिकारी-
श्री शशिकांत पाटील,
पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगांव.
▶️ सापळा पथक- श्री शशिकांत पाटील,पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. जळगांव. पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने.
▶️ कारवाई मदत पथक-
स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ.सचिन चाटे,पो.कॉ.प्रणेश ठाकुर.
▶️ मार्गदर्शक-
1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
2) मा.श्री.एन.एस.न्याहळदे साो., अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
3) मा.श्री.नरेंद्र पवार, साो., वाचक पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी- मा.पोलीस अधीक्षक सो ,जळगाव.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 8766412529

@ टोल फ्रि क्रं. 1064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *