अमळनेर तालुक्यात “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमास शाळांचा उत्स्फूर्त सहभाग…
![]()


अमळनेर तालुक्यात “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमास शाळांचा उत्स्फूर्त सहभाग…
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पंतप्रधान महोदय यांच्या समवेत “परीक्षा पे चर्चा -६” या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी दुपारी अकरा वाजता नवी दिल्ली येथून इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समवेत संवाद साधला गेला या कार्यक्रमांमध्ये देश विदेशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक सहभागी झाले. त्या अनुषंगाने सदर कार्यक्रम दूरदर्शन ,विविध खाजगी माध्यमांवर तथा वाहिनीवर प्रक्षेपण केले गेले. याच अनुषंगाने अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने शहरातील व तालुक्यातील सर्व माध्यमिक उच्च प्राथमिक शाळांमध्ये विविध टीव्ही, प्रोजेक्टर व इतर साधनांच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी तो कार्यक्रम पाहून यशस्वी केला
अमळनेर तालुक्यात
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा अमळनेर तालुक्याचा अहवाल खालील प्रमाणे पाठवत आहोत.
१) तालुक्याचे नाव :- अमळनेर
२) तालुक्यातील सहावी ते बारावीचे वर्ग असलेल्या शाळांची संख्या- 119
३) लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात आलेल्या शाळांची संख्या:- 119
४) कार्यक्रमाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या :- 15897
५) कार्यक्रमास उपस्थित पालकांची संख्या :- 780
६) कार्यक्रमास उपस्थित शिक्षकांची संख्या :- 937
७) लाईव्ह प्रक्षेपण न दाखवणाऱ्या शाळांची संख्या:-निरंक
८) प्रक्षेपण न दाखवण्याचे कारण :- निरंक
९) शेरा :–
अशा पद्धतीने गटशिक्षणाधिकारी व विस्ताराधिकारी यांनी केंद्रप्रमुखांच्या मार्फत मुख्याध्यापकांकडून अहवाल घेत “परीक्षा पे चर्चा” हा कार्यक्रम यशस्वी केला. यासाठी अमळनेर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील यांनी मार्गदर्शन व नियोजन केले व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांनी सहकार्य केले.

