1 min read

जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या सहकार गटाचे मधुकर आनंदा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

Loading

सहकार गटाचे मधुकर आनंदा पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला

विविध संघटनाचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहकार पँनलला पाठिंबा…

अमळनेर प्रतिनिधी
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2022-27 जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ शिक्षकेतर कर्मचारी संघाचे सहकार पॅनलचे अमळनेर तालुका सर्वसाधारण मतदार संघाचे पाटील मधुकर आनंदा( एम.ए पाटील) मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल जुनियर कॉलेज तांबेपुरा अमळनेर, माजी अध्यक्ष अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ, हिशोब तपासणी जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचा आज अमळनेर येथील विजय मारुती समोर प्रचाराचा नारळ फुटला.
यावेळी सहकार पँनलचे प्रमुख शालीग्राम भिरूड यांच्या पुर्ण पँनलला
विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. आतापर्यंत संघटनेच्या माध्यमातून भिरूड सर व पदाधिकारी यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. जिल्हा माध्यमिक पतपेढीच्या माध्यमातून सभासद हित जोपासले आहे. त्यामुळे सहकार पँनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी पदाधिकारी यांनी आवाहन केले. सहकार पँनलचे जनरल गटातून मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष, शिवाजी हायस्कूल चे मुख्याध्यापक मधुकर आनंदा पाटील
(एम.ए.पाटील) हे मितभाषी उमेदवार आहेत त्यांना कपबशी या चिन्हावर फुली मारून विजयी करावे असे आवाहन करण्यात आले.
यावेळी प्रचार नारळ फोडण्यासाठी
सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील, मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस.डी देशमुख ,शिक्षक भारतीचे आर.जे पाटील ,राहुल बहीरम, कलाध्यापक संघटनेचे आर.डी चौधरी ,गणित मंडळाचे अध्यक्ष डी.ए.धनगर,विज्ञान मंडळाचे डि.के.पाटील, एस एन पाटील गायकवाड हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंदराव नेतकर, मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष भास्कर चौधरी,देवळी हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, शिवाजी हायस्कूलचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शरद शिंदे ,उर्दू हायस्कूलचे अनिता मॅडम, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर डी बोरसे,मुख्याध्यापक नरेंद्र साळुंखे, बाळासाहेब पाटील ,हर्षल पाटील,नगरसेवक विवेक पाटील,स्वप्निल पाटील, संजय सोनवणे आर.डी पाटील ,रणाईचे हायस्कूलचे नेरपगारे सर, उदय पाटील पिंपळे आश्रम शाळा,भाऊसाहेब संजय गोसावी, एस.एन.पाटील, प्रशांत हिरे,सर्जराव सिसोदे,सोनवणे भाऊसाहेब, प्रविण पाटील सर,केदार पवार, डि.बी.साळुंखे, आर.डी.पाटील,
ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष ईश्वर महाजन, जिल्हा संघटक पी.एस.विंचूरकर,तालुकाध्यक्ष सोपान भवरे,विविध संघटनेचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *