1 min read

मंगरूळ ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणचा मान मिळाला सफाई कर्मचाऱ्याला….

Loading

आज आपल्या मंगरूळ ग्रामपंचायत च्या सरपंच सौ हर्षदा संदीप पाटील यांच्या विचारातून मंगरूळ ग्रामपंचायत चे ध्वजारोहण चा मान ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी यांनी गावाला 32 वर्ष सेवा दिली ते श्री रमेश श्रावण मरसाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून गावात एक नवीन आदर्श निर्माण केला तळागाळातील सर्व सामान्य माणसाला ध्वजारोहणाचा सन्मान दिल्याने गावात सर्वत्र या गोष्टीचा ग्रामपंचायतचा कौतुक होत आहे रमा भाऊ यांनी गावात साफसफाई स्वच्छता गटार काढणे गावातील कचरा साफ करणे गावातील कोणाच्याही घरी दुःखद घटना घडली असेल त्यांच्या अंत्ययात्रेसाठी लागणारी व्यवस्था वेळेवर पुरविणे व त्यानंतर तेथील साफसफाई करणे असे सेवेचे कार्य त्यांच्या हातून झाले आहे या सर्व गोष्टींचा सरपंच हर्षदा संदीप पाटील सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांनी चांगला निर्णय घेऊन एक नवीन पायंडा पाडला आहे यावेळी तरुण मित्र परिवाराच्या वतीने रमा भाऊंचा सह पत्नी सत्कार देखील करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *