1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
पेंशनपिडीत कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन..
![]()


एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शालेय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना हॉटेल रामा इंटरनॅशनल औरंगाबाद येथे आयोजित बैठकीमध्ये मध्ये भारतीय जनता पक्ष परभणी महानगर अध्यक्ष मा.आनंदरावजी भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित अशोक रसाळ,अभिजित धानोरकर, काकासाहेब कोल्हे ,निरज पौळ व इतर सर्व सहकारी.
लवकरच यासंदर्भात बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी आश्वसित केले.

