“घ्यावी उंच भरारी!
म्हणून ग्रंथालय आपल्या दारी!अभिनव उपक्रम पिंपळे आश्रमशाळेत
![]()


“घ्यावी उंच भरारी!
म्हणून ग्रंथालय आपल्या दारी!
अभिनव उपक्रम पिंपळे आश्रमशाळेत
श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी संचलित सु.अ.पाटील प्राथमिक व यशवंत माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत आज दिनांक 23 जानेवारी2023 रोजी *घ्यावी उंच भरारी ,ग्रंथालय आपल्या दारी या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय *श्री. पवन पाटील साहेब *सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल* यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमास आश्रम शाळेचे प्राथमिक व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री अविनाश अहिरे व श्री उदय पाटील, श्री चेतन पाटील , श्री प्रवीण पाटील , श्री उदय भाऊसाहेब , श्री सतीश कागणे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वप्निल एल. पाटील यांनी केले. पुस्तक वाचनाने माणसाच्या जीवनात कसे बदल होतात हे आवर्जून सांगितले ,तसेच पुस्तकांशी मैत्री करा व दररोज एक तास वाचण्याचा संकल्प करा हेही विद्यार्थ्यांना सांगितले .वाचनाने मेंदूला चालना मिळते व जीवन तसेच माणूस संस्कारक्षम होते . कार्यक्रमात बी. बी. वानखेडे यांनी पुस्तके मनाचे अन्न आहे, वाचनाने थोर व्यक्ती कशा घडत गेल्या . आजच्या या सोशल मीडियाच्या युगात ग्रंथालय कसे ओस पडत आहेत, मनोगतातून व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालय समिती मार्फत करण्यात आले होते. यावेळी ग्रंथालय समितीचे सदस्य श्री स्वप्निल पाटील ,श्री अविनाश पाटील व श्रीमती सविता मुळे मॅडम यांनी नियोजन केले. ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती मुळे मॅडम यांनी पुस्तक प्रदर्शनात पुस्तकांची मांडणी व रेखीव रांगोळ्या आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींकडून काढून घेतल्या. रांगोळी प्रदर्शनातून पुस्तकांचे महत्त्व व संदेश दिला व ज्ञान प्रबोधन केले. सदर कार्यक्रमासाठी संजू पवार सर यांनी उत्कृष्ट फलक लेखन केले .तसेच सदर कार्यक्रमास हेमंत पाटील सर यांचे सहकार्य लाभले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

