1 min read

जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांना जिवन गौरव पुरस्कार

Loading

जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार डॉ रविंद्र भोळे ह्यांना जिवन गौरव पुरस्कार

पिंपळे सौदागर पुणे:लेवा भ्रातृमंडळ संस्थेचयावतीने पिंप ले सौदागरपिंपरी चिंचवड येथील जीवन गौरव पुरस्कार सन्मान पत्र देउन गौरविण्यात आले.डॉ रविंद्र चौधरी अध्यक्ष एल सी सी आय ए ह्यांचे हस्ते खास मानपत्र देउन सन्मानित करण्यात आले ह्या प्रसंगी लेवा भ्रातृमंडळ अध्यक्ष विकास लीलाधर वारके, निलेश ज्ञानदेव पाटील चिटणीस, जितेंद्र चौधरी कोष्याधक्ष, आदरणिय श्री कृष्णाजी खडसे साहेब, आदरणिय श्री पुरूषोत्तम पिंपळे, पदाधिकारी, प्रमुखy उपस्थितीआदरणिय खासदार श्रीरंग बारणे,, आदरणिय श्री श्यामसुंदर पाटील आय ए एस उद्योजक, डॉक्टर्स,अनेक समाजबांधव उपस्थित होते. डॉ रविंद्र भोळे हे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार, अपंग सेवक असून गेली पस्तीस वर्षेपासून समर्पित भावनेने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावित आहे. माराठवाडा भूकंप, नैसर्गिक आपत्ती काळात महत्व पुर्ण सेवा केलेली असून पद्मश्री डॉ मणीभाई देसाई प्रतिष्ठान नीती आयोग संलग्नित, युवा क्रीडा मंत्रालय भारत सरकार संलग्नित संस्थेच्यवतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहेत.तसेच डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट निती आयोग संलग्नित व आय एस ओ प्रमाणीत संस्थेचया वतीने वोकेशनल ट्रेनिंग कोर्सेस चालविले आहेत. उरुळी कांचन येथे सरस्वती शाळेचे उपाध्यक्ष, महावीर मूकबधिर विद्यालयाचे सल्लागार सदस्य, संत यादव बाबा हायस्कूल चे सल्लागार आहेत. तसेच राज्यातील अनेक अपंग, संस्थांमध्ये कार्य रत आहेत.वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे राज्य वैद्यकीय प्रमुख असून लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे सल्लागार ट्रस्टी आहेत.तसेच उरुळीकांचन डॉक्टर्स वेल्फेअर असोसिएशन चे संस्थापक ट्रस्टी आहेत. डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय विचार मंच देल्ही संस्थेचे महाराष्ट राज्य प्रमुख अध्यक्ष आहेत.राष्ट्र भक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहेत.डॉ रविंद्र भोळे परिसरातील सुप्रसिद्ध समाजसेवक प्रवचनकार प्रबोधनकार आहेत.तसेच राष्ट्रीय सेवा योजना मार्गदर्शन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, ग्रामस्वच्छता अभियान, रक्तदान कार्ये केलेली आहेत.समर्पित भावनेने विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ रविंद्र भोळे ह्यांना बारा वर्ल्ड रेकॉर्ड बुक सन्मान, दोनशे एंशी इंटरनॅशनल, नॅशनल, स्टेट अवॉर्ड प्राप्त झालेले आहेत . अनेक विद्यमानखासदारांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त होण्यासाठी नामांकन केलें आहे. डॉ रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्राच्या माध्यमातून डॉ भोळे धर्मदाय प्रकारे गरजू रुग्णांना वैद्यकिय सेवा देत आहेत.डॉ रविंद्र भोळे ह्याच्या समर्पित भावनेने निरंतर निरपेक्षपणे कार्य केल्याबद्दल पारधी समाजातील प्रज्ञावंत लेखक भास्कर भोसले ह्यांनी, वाळवंटातील समाजसेवी सरोवर डॉ रविंद्र भोळे ‘ हे चरित्रात्मक पुस्तक लिहून स्व बाबासाहेब पुरंदरे ह्यांचे हस्ते प्रकाशित करण्यात आले होते . त्यांना जिवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्या बद्दल अनेक मान्यवरानी अभिनंदन केले आहे.ह्या प्रसंगीअस्मिता नागरी सहकारी ग्रामीण महिला पतसंस्थेच्या संचालिका सौ संगीता भोळे उरुळीकांचनह्यांचा गौरव करण्यात आला.

( ज्येष्ठ समाजसेवक, पद्मश्री मनीभाई देसाई ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक दादासाहेब डॉक्टर रवींद्र भोळे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्र पत्रकार संघ, ओबीसी शिक्षक असोसिएशन, वेब मीडिया असोसिएशन यांच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *