1 min read

महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडामहोत्सवाचे बक्षिस वितरण !..

Loading

महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडामहोत्सवाचे बक्षिस वितरण !..

छंदातून व्यवसाय करणारे विजय महाजन यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी – मुख्या.जे.एस.पवार

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे ३ जानेवारी ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती महोत्सवाच्या निमित्ताने क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आज क्रीडा महोत्सवाच्या बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक एच डी माळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी समर्थ भोजनालयाचे संचालक विजय महाजन, नितीन महाजन, निवृत्ती महाजन, गजानन महाजन, गजानन शामराव माळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व प्रमुख अतिथींचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख अतिथी विजय महाजन यांनी ३ जानेवारी आपल्या जन्मदिनानिमित्त शाळेला क्रीडास्पर्धेच्या निमित्ताने ३,००० रुपये किमतीची ट्रॉफी व मेडल भेट दिली.
मान्यवरांच्या हस्ते गोळा फेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी, लिंबू चमचा, एक मिनिट, गोणपाट स्पर्धा, १०० मी. धावणे, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, रस्सीखेच अशा विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या सर्व मुला-मुलींना सन्मानचिन्ह व मेडल मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी विजय महाजन यांनी आपला जीवन संघर्ष उलगडला. मी दहावी नापास असून देखील जिद्द, चिकाटी, परिश्रम केले. मला रेसिपी करण्याची आवड होती म्हणून मी समर्थ भोजनालय धरणगाव मध्ये सुरू केले मला दोनशे प्रकारच्या रेसिपी येतात. अभ्यास करा शिक्षण घ्या !.. आई-वडिलांचे व शाळेचे नाव मोठे करा असे प्रतिपादन महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी छंदातून व्यवसाय निर्माण करणारे विजय महाजन यांचा जीवन संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. मुलांनो खचून न जाता व्यवसायाच्या माध्यमातून देखील आपण प्रगती करू शकतो असा मोलाचा संदेश पवार यांनी दिला.
याप्रसंगी याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पर्यवेक्षक एम बी मोरे, जेष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, एस व्ही आढावे, सी एम भोळे, एच डी माळी, एस एन कोळी, पी डी पाटील, व्ही टी माळी, श्रीमती व्ही पी वऱ्हाडे, एम जे महाजन, लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, सेवक अशोक पाटील, जीवन भोई उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक एच डी माळी तर आभार एस एन कोळी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *