1 min read

जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर.

Loading

जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर.

जळगांव: महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या आदेशांन्वये व विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या निर्णयानुसार महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा.डॉ. संजयजी शिंदे आणि विभागीय अध्यक्ष प्रा.बी. ए. पाटील यांच्या सूचनेनुसार आज जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची तातडीची सभा अण्णासाहेब डॉ.जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगांव येथे दुपारी पार पडली. सदर सभेत नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवीत असलेले अपक्ष उमेदवार श्री. सत्यजित तांबे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. सदर सभेचे अध्यक्षस्थान जिल्हाध्यक्ष प्रा.नंदन वळींकार यांनी भूषविले. यावेळी जिल्हा सचिव प्रा. सुनील सोनार यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीस पाठिंबा देण्याचा प्रस्ताव मांडला. सदर प्रस्तावाला कार्याध्यक्षद्वय प्रा.शैलेश राणे व प्रा.सुनील पाटील यांनी अनुमोदन दिले. यावेळी गेल्या सतरा वर्षांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध समस्यांच्या संदर्भात मावळते पदवीधर आमदार डॉ. सुधीरजी तांबे यांनी विधिमंडळात केलेल्या पाठपुराव्यांचा आवर्जून उल्लेख करण्यात आला. सदर कालखंडामध्ये डॉ. तांबे यांनी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रमुख मागण्या जसे की, १/१/२००५ नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, आश्वासित प्रगती योजना लागू करणे, टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी अनुदानाचा टप्पा मिळवून देणे, शालार्थ आयडी मिळवून देणे, मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित असलेली वैद्यकीय बीले मंजूर करून घेणे या व इतर असंख्य मागण्यांच्या संदर्भात वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याचा उहापोह करण्यात आला व समस्त जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्यावतीने डॉ.सुधीरजी तांबे यांचे जाहीर आभार मानून असेच सहकार्य त्यांचे सुपुत्र श्री. सत्यजित तांबे देखील करतील असा आशावाद व्यक्त करून त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. यासभेला जेष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड, जिल्हा उपाध्यक्ष सर्वश्री.प्रा.अतुल इंगळे,प्रा.राजेश भटनागर प्रा.जितेंद्र पाटील सहसचिव प्रा.डी.जे. चिकटे, महानगराध्यक्ष प्रा.राहुल वराडे,ग्रामीण अध्यक्ष प्रा.सुधाकर ठाकूर, प्रा. स्वप्निल धांडे, प्रा.शशीकांत पाटील, प्रा.संदीप पाटील (पारोळा) प्रा.निखिल जोगी प्रा. दीपक बारी प्रा.डॉ. डी. यु.राठोड, प्रा.धनराज भारुडे, प्रा.स्वप्नील पवार, प्रा.अनिल सोनवणे, उपप्राचार्य श्रीमती एस.बी. पाटील, प्रा.सौ.अनिता ओव्हाळ, प्रा.श्रीमती शुभांगी चिरमाडे, प्रा.भारती महाजन यांचेसह असंख्य प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *