अंत्योदयआणि प्राधान्य कुटुंबाना आता मिळणार मोफत धान्य…तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची माहिती
![]()
अंत्योदयआणि प्राधान्य कुटुंबाना आता मिळणार मोफत धान्य…
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांची माहिती
अमळनेर प्रतिनिधी

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेत 2-3 रु किलोऐवजी मोफत धान्य
सर्व जनतेस सुचित करण्यात येते की केंद्र शासनाने जानेवारी 2023 पासून अन्न सुरक्षा
कायद्याखाली दिले जाणारे धान्य मोफत देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार,
दिनांक 1 जानेवारी 2023 पासून अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत अंतोदय अन्न योजना आणि प्राधान्य
कुटुंब लाभार्थी योजनेमध्ये दिले जाणारे धान्य । वर्षापर्यंत मोफत दिले जाईल.
हे धान्य देताना त्याची स्वतंत्र पावती दिली जाईल.
या धान्याची उचल करताना लाभार्थ्याचे स्वतंत्र बायोमेट्रिक प्रमाणीकरण (इ-पॉस मशीनवर वेगळयाने
अंगठा देणे) करावे लागेल.
सर्व लाभार्थ्यांना यापूढे वर्षभर उपरोक्त धान्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत याची नोंद घ्यावी.असे आवाहन
(मिलिदकुमार वाघ) तहसिलदार अमळनेर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

