1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा इंटरमिजीएट परीक्षेचा १०० % निकाल !..

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा इंटरमिजीएट परीक्षेचा १०० % निकाल !..

मुख्याध्यापक यांच्या हस्ते कला शिक्षक एच.डी.माळी यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान !….

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेचा शासकिय रेखाकला परीक्षा – २०२२ अंतर्गत इंटरमिजिएट परीक्षेचा १०० % निकाल लागला. या इंटरमिजिएट परीक्षेला शाळेतून ११ विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या व संपूर्ण विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे कलाशिक्षक एच डी माळी यांचा शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व गुणवंत विद्यार्थिनींचे कौतुक केले.
याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक एम बी मोरे , ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे, सी एम भोळे, कला शिक्षक एच डी माळी, एस व्ही आढावे, एस एन कोळी, व्ही टी माळी, पी डी पाटील, श्रीमती. एम जे महाजन, लिपिक पी डी बडगुजर, ग्रंथपाल गोपाल महाजन, सेवक अशोक पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन उपशिक्षक पी डी पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *