बोळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
पुणे येथील युवकमित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप.
![]()
बोळे विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
पुणे येथील युवकमित्र परिवाराच्या ‘सायकल बँक’उपक्रमंतर्गत मोफत सायकलीचे वाटप.

पारोळा दि.१८
पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेमार्फ़त राबविल्या जाणाऱ्या सायकल बँक उपक्रमाअंतर्गत ‘महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, बोळे (ता.पारोळा) येथे बोळेतांडा,शेवगे प्र ब,व कराड़ी येथून ३ ते ४ कि.मि.वरून पायी चालत येणाऱ्या अत्यंत गरीब व गरजु अशा ३० विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करण्यात आल्या.यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पुणे येथील युवकमित्र परिवार संस्थेचे संस्थापक तथा सायकल बँक योजनेचे प्रमुख प्रवीण महाजन हे होते.तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर.यू.मोरे होते.
पुणे शहरातील नागरिकांनी त्यांच्याकडे पडून असलेल्या विनावापर सायकली दान केल्यानंतर त्या दुरुस्त करून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये’सायकल बँक’उपक्रमाअंतर्गत मोफत वाटप केल्या जातात.
राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त आयोजित या कार्यक्रमात युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन यांनी याच आठवड्यात संपूर्ण खान्देशातील शाळामध्ये पायपीट करणाऱ्या २५० वंचित विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप करणार असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ .जितेंद्र नारायण गिरासे, जळगाव माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक नंदकुमार पाटील, केंद्रप्रमुख संजय चव्हाण,बोळे केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
सायकल दुरुस्तीकरीता शाळेचे माजी विद्यार्थी तथा अमेरिका येथील अभियंता कैलास गिरासे यांचे सहकार्य लाभले.तर उपक्रम यशस्वीतेसाठी पारोळा येथील प्रशांत महाजन,बापू महाजन व छोटू गिरासे यांचे सहकार्य लाभले.
सूत्रसंचालन एम आर पाटील प्रास्ताविक एस व्ही देवरे व आभार जी.व्ही जाधव यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

