मंत्री कार्यालयात मिळते सामान्य जनतेला
अपमानास्पद वागणूक!,माजी जनसंपर्क अधिकारी उदय नरे यांचा खुलासा)
![]()

मंत्री कार्यालयात मिळते सामान्य जनतेला
अपमानास्पद वागणूक!
(माजी जनसंपर्क अधिकारी उदय नरे यांचा खुलासा)
शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक अशा प्रकारची बातमी समाज माध्यमांवर वायरल झाली आहे. आपल्या प्रतिनिधीने सदर बातमी मध्ये अनेक माजी शिक्षण मंत्री महोदयांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड मँडम या जनतेला भेटत नसत परंतु त्याचा कार्यालयात सामान्य जनतेचा अपमानास्पद वागणूक होत नसे असे संबधित पत्रकारांने लिहिले आहे.
प्राध्यापक वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री असताना राज्यातच नव्हे तर देशात कोरोनाचे थैमान घातले होते. शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचा जनसंपर्क अधिकारी म्हणून मी त्यावेळी कार्यरत होतो. शालेय शिक्षण मंत्री या काळात कोरोना मुळे तीन वेळा पाँजीटीव्ह होत्या यामुळे अनेकदा ईच्छा असुनही अभ्यासगतांना भेटू शकत नव्हत्या. कोरोनाच्या काळात अनेक बैठका या आँनलाईन स्वरूपात होत होत्या. शिक्षण अधिकारी व मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी वर्गाशी आँनलाईन संपर्कात असल्याने निवासस्थानी असूनही प्रत्यक्ष उपलब्ध होत नसल्याने गैरसमज निर्माण झाले असतील!. मंत्री महोदयांच्या कार्यालयात व निवासस्थानी आलेल्या व्यक्तींना तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वेळोवेळी भेटत असत. तसेच मंत्री महोदयांनी दिलेल्या सुचनांनुसार आम्ही कर्मचारी वर्ग बंगल्यावर आलेल्या प्रत्येक अभ्यासगत, शिक्षक व शिक्षण अधिकारी यांना सतत उपलब्ध होत होतो. जनतेची निवेदन स्वीकारून ते मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणत असू. अनेक शैक्षणिक समस्यांचा पाठपुरावा करून आमच्या स्तरावर न्याय देण्यासाठी प्रयत्न करत होतो.
कोरोनाच्या काळात दहावी व बारावीच्या परीक्षाचे उत्कृष्ट नियोजन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण अधिकाऱ्याने केले. राज्यातील शैक्षणिक संस्था बंद असल्यातरी शिक्षण सुरळीतपणे सुरू होते. शिक्षण विभागाकडे येणाऱ्या अनेक तक्रारी आर्थिक बाबतीतही होत्या. शालेय शिक्षण मंत्री आपल्या विभागातील आर्थिक बाबतीत तत्कालीन अर्थमंत्री अजीतदादा पवार यांच्याकडे सातत्याने मांडत असत. राज्यातील शिक्षक आमदारांशी सतत संपर्कात होत्या. प्रसार माध्यमांतून विद्यार्थी, पालक व शिक्षकांशी संवांद साधत होत्या. यामुळे शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड जनतेसाठी उपलब्ध होत नव्हत्या असे वक्तव्य करणे संयुक्तिक होणार नाही. मंत्री महोदयांच्या तत्कालीन जनसंपर्क अधिकारी म्हणून मी हा खुलासा करत आहे.
आपल्या बातमी मधील दुसरा मुद्दा मंत्री महोदयांचे खाजगी सचिव जनतेशी उध्दटपणे वागतात, कार्यालयात आलेल्या जनतेला अपमानास्पद वागणूक देतात. मंत्री महोदयांच्या कार्यालयातील डौलारा हा त्यांचा कर्मचारी वर्गावर अवलंबून असतो. ओएसडी (विशेष कार्यकारी अधिकारी), खाजगी सचिव, लिपीक व शिपाई यांच्या समन्वयातूनच होत असतो. मंत्री महोदयांच्या भेटीसाठी सर्वच आतूर असतात. अनेकदा कार्यबाहुल्यामुळे सर्वच अभ्यासगतांना भेटणे शक्य नसते व काही वेळा संयुक्तिकही नसते अशा वेळी जनतेशी कशा प्रकारे वर्तणुक करावी यासंदर्भातील सुचना व प्रशिक्षण मंत्री महोदयांनी आपल्या कर्मचारी वर्गांना देणे फार आवश्यक आहे. मंत्री महोदय व राज्य सरकारची प्रतिमा कर्मचारी वर्गावर अवलंबून असते. प्रसार माध्यम समाजाचा आरसा असल्याने यातून निर्माण होणाऱ्या प्रतिमा महत्त्वपूर्ण असतात.
वर्तमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केवळ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री पदभार नसून मराठी विभाग सुध्दा आहे व त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते सुध्दा आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते व जनतेच्या संपर्कात ते असतात अशावेळी प्रत्येकांना प्रत्यक्षात भेटणे मंत्री महोदयांना प्रत्येकवेळी शक्य होणार नाही अशावेळी त्यांची मदार मात्र आपल्या कार्यालयावरच अवलंबून असते.
उदय जी. नरे
माजी जनसंपर्क अधिकारी
शालेय शिक्षणमंत्री.

