हात से हात जोडो अभियान अंतर्गत अमळनेर तालुका व शहर कांग्रेस कमिटी तर्फे बैठकीचे आयोजन
![]()

हात से हात जोडो अभियान अंतर्गत अमळनेर तालुका व शहर कांग्रेस कमिटी तर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जळगाव जिल्ह्याचे माजी अध्यक्ष व नाशिक जिल्हा ग्रामीण कांग्रेस कमिटीचे व अमळनेर शहर कांग्रेस व तालुका कांग्रेस कमिटीचे निरीक्षक म्हणून एड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीस समन्वयक म्हणून श्री. किरण पाटील, महाराष्ट्र कांग्रेस सेवादलाचे उपाध्यक्ष श्री. अजबराव पाटील, जिल्हा ओ. बी. सी. सेलचे डी. डी. पाटील, जिल्हा महिला कांग्रेस कमिटीचे अध्यक्षा सौ. सुलोचनाताई वाघ, शहर अध्यक्ष श्री. मनोज पाटील, तालुकाध्यक्ष श्री. गोकुळ बोरसे, श्री. अशोक दादा पाटील, श्री. शांताराम नाना पाटील, श्री. के. डी. पाटील, श्री. संदीप घोरपडे सर, श्री. चंद्रकांत शर्मा जी, सेवादलाचे अध्यक्ष श्री. बन्सीलाल भागवत गुरुजी तसेंच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

