1 min read

लक्ष्मणराव पाटील यांचा विकल्प कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा…

Loading

लक्ष्मणराव पाटील यांचा विकल्प कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा…

धरणगाव प्रतिनिधी —

धरणगाव — येथील विकल्प युथ अँड रुरल डेव्हलपमेंट रिसर्च मल्टिपर्पज ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.रविंद्र एस मराठे यांच्याकडे सुपूर्द केला.
लक्ष्मणराव पाटील यांची नुकतीच शासकीय विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या अशासकीय सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. कोणत्याही संस्थेच्या कार्याची कक्षा म.धर्मादाय आयुक्त यांच्या अंतर्गत येत असल्याने तसेच कोणतीही संस्था शासकीय अनुदानासाठी पात्र असल्याने आपलं पद आणि संस्था असं समीकरण तयार होऊ नये म्हणून लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जगद्गुरू तुकोबांच्या चरित्राचा आदर्श असा आहे की, तुकोबांनी समाजपरिवर्तनाचे कार्य हाती घेण्याआधी कर्जखते इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली होती. या मागे व्यापक विचार होता की, आपण कोणाचं काही देणे नाहीत आणि आपल्याकडे कोणाचं काही घेणं नाही. तुकोबांचे नाव घेण्याचा प्रयत्न नैतिक दृष्टीने करायचा असेल तर आपण देखील कोणत्याही लाभाच्या पदावर राहू नये म्हणून आज छत्रपती शंभूराजे यांच्या राज्याभिषेक दिनी हा राजीनामा देत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *