1 min read

लग्नाची विस वर्षे…..

Loading

प्रत्येक पुरूषाच्या यशामागे एक स्त्री असते. आयुष्याच्या काही टप्प्यावर ती आई, बहीण, मुलगी या नात्यातून पाठीशी उभी राहते. मात्र स्त्री जेव्हा पत्नी होते तेव्हा ती आयुष्यच काय सात जन्म साथ सोडत नाही.समाजाने निर्माण केलेलं हे नातं वैवाहिक जीवनात कधी एकरूप होऊन जातं हे तिच्या पतीलाही कळत नाही. कुणाच्या घरची मुलगी अथवा बहीण जेव्हा लग्नानंतर तुमची पत्नी होते तेव्हा तिचं अवघं व्यक्तिमत्वच बदलून जातं. पत्नीची भूमिका सांभाळतांना तिला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. स्वतःचा मूळ स्वभाव, आवडीनिवडी बदलून ती फक्त तुमच्या जीवनाची सहचारिणी झालेली असते. पत्नीला प्रत्येकवेळी मोठमोठ्या भेटवस्तू, महागड्या साड्या, मौल्यवान दागदागिनेच हवे असतात असं नाही. खरंतर तिला हवं असतं निस्वार्थ प्रेम, आदर आणि तिच्या कष्टाची जाणीव असणारं प्रेमळ मन…
पत्नीचे नाते हे जन्मांतरीचे नाते असते. लग्नाच्या पवित्र नात्यात बांधलेले. हे नाते अधिकच दृढ होत जाते.पतीसाठी बायको म्हणजे फक्त त्याची आयुष्याची जोडीदार नाही तर अर्धांगिनी असते. म्हणजे ती माझ्या प्रत्येक गोष्टीत समान वाटेकरीअसते…सुख असो वा दुःख पत्नी पतीची साथ कधीच सोडत नाही….
आज आमच्या लग्नाला १६ जानेवारीला 20 वर्ष पूर्ण झालीत… वर्ष कुठे निघाले कळालेही नाही… एवढ्या वर्षात अनेक घडामोडी झाल्या… कधी सुख दुःख अशा सगळ्याच समस्यांना आम्ही सामोरे गेलो….. आईचं निधन झालं आजही या घटनेवर विश्वास बसत नाही ..
आईच्या सर्वच आठवणी माझ्या हृदयात आहेत… कधी कधी असं वाटतं… आई आमच्या जवळच आहे… माझ्या सहचारिणीने आम्हा सर्व परिवारांना एका धाग्यात बांधून ठेवलं… स्वतःपेक्षा परीवारावर अधिक प्रेम केले… जेव्हा 16 जानेवारी 2003 ला आमचा विवाह झाला… अगोदरचे जीवन खूपच खडतर होतं हे तेवढेच सत्य…. ज्योती माझ्या जीवनात आल्याने माझंआयुष्यच बदलून गेले… अनेक संकट आली त्या सर्व संकटात खंबीरपणे पाठीशी उभी राहत त्यातून मार्ग निघत गेला… माझ्या आई-वडिलांना मी नोकरीला लागलो याचा खूप मोठा अभिमान होता…
अशावेळी नोकरीला लागतांना मामांचं मोठं सहकार्य लाभलंच… मामांनी नेहमीच माझ्या प्रत्येक चांगल्या कामाचं मनापासून कौतुक केले व प्रेरणा दिली…भावांचे प्रेम तेवढेच होते…. घरातील एक व्यक्ती नोकरीला लागली याचा आनंद परीवारात द्विगुणीत होता.. गेल्या 20 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रातील केलेल्या कामाचे जिच झाले. यात ज्योतीची खंबीर साथ होती… वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतांना राज्यभर मैत्रीचा गोतावळा निर्माण करता आला. ज्या संस्थेत नोकरीला लागलो त्याच संस्थेचे सदासर्वे यांनी प्रेरणा दिली.. आज सगळ्या क्षेत्रात काम करतांना खूपच आनंद वाटतो कधी थकवा आला नाही, कधी कंटाळा आला नाही यात परिवाराची ऊर्जा होती.. माझ्या प्रत्येक कामात माझ्या अर्धांगिनीचा हात होता हे तेवढेच सत्य….
16 जानेवारीला जेव्हा लग्न लागले.. काही क्षणात सर्वच बदलून गेले….
नाती चारामिचा मंत्र जपत…
मी तुझा हात हातात घेतला…!
आई-वडिलांच्या उंबरठ्याची चौकट ओलांडून तू माझ्या जीवनात आलीस आणि वर्तुळ पूर्ण झाले.
तुझ्या येण्याने त्या असण्याला स्वत्व लाभले.
नेहमी सकारात्मक… नकारात्मकता च्या निरर्थक पागोळ्यात गुरफटलेला मी….
तुझ्या येण्याने मला लौकीकाचे भान दिले…
तू मला काय दिले….
याचे उत्तर म्हणजे तू माझ्या जीवनातील सार आहे….
पण तुझ्या असण्याने मला असण्याचे अस्तीत्व दिले आहे…!
परमेश्वराकडे तुझ्यासाठी नेहमी आनंद मागतो 💕आयुष्यात तुझ्यासाठी नेहमी सुख मागतो तुझ्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही 💘प्रत्येक जन्मी मी तुलाच मागतो🎂
माझ्या जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तू आहेस..
वसंत ऋतूतील येणारी बहार तू आहेस 💕
माझ्या जगण्याचे सार तू आहेस
तू.. . ….
माझी सोबती ❤माझी छाया माझे सुख
माझे जीवन 💘माझा प्राण माझी ज्योती🎂 …….।।।
तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂💑🎉
🎂💐💐💐🎂🎂🎂🎂💐

सदैव तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणारा तुझाच…..
ईश्वर आर महाजन
अमळनेर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *