1 min read

पिंपळे बु॥ येथे तब्बल पंचवीस वर्षांनी परतली लालपरी

Loading

पिंपळे बु॥ येथे तब्बल पंचवीस वर्षांनी परतली लालपरी

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर

धरणगांव – तालुक्यातील पिंपळे गावात अखेर आली गावात ‘ लालपरी ‘ विध्यार्थ्यांनी मागणी लावून धरल्याने पिंपळे बु।। ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्यावर गावात एस.टी. सुरू झाली आज पहिल्या दिवशी गावात एसटी आल्यावर गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले गावातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी एक किलोमीटर फाट्यावर पायी जावे लागत होते तर विध्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाल्यावर त्यांनीही आभार व्यक्त केले.
सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठपुरावा केल्यानंतर व गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने गावातील सरपंच कविता विनोद पाटील व उपसरपंच किरण मनोहर पाटील व माजी सभापती प्रमोद पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने गावात एसटी सुरू झाली गावात काहीही समस्या उद्भवणार नाही अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *