बेवारस प्रेतांच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टिम
![]()
बेवारस प्रेतांच्या अंत्यविधीसाठी सरसावली माणुसकी समूहाची टिम
सु-लक्ष्मी बहुद्देशिय संस्थेच्या वतीने मदतकार्य

सिल्लोड शहर पोलीस ठाणे २/२०२३ कलम १७४ सी आर. पी. सी. प्रमाणे दाखल असुन सदर मयत हा सिल्लोड येथील शिवसेना भवन कार्यालयासमोर आजारी अवस्थेत असल्याने त्यास पोलीसांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात घाटी औरंगाबाद येथे उपचारकामी दाखल केले होते. परंतु दि.०६-०१-२०२३ रोजी उपचारादरम्यान घाटी रुग्णालय औरंगाबाद येथे मृत्यु झाल्याने शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मयताची माहिती सदर पोलीस स्टेशन सिल्लोड येथे माहीती कळविली असता सदत मयता ची ओळख पटविण्या करीता शासकीय रुग्णालयात औरंगाबाद येथे मृतदेह शवगृहात ठेवले असता सदरील मयताची ओळख पटली नाही त्यांचे कोणीच नातेवाईक आढळून आले नाही ही बाब समोर आली असता , ८ दिवसानंतर मयताचे अंत्यविधीसाठी सदर सिल्लोड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक मुदिराज यांनी बेवारसाच्या अत्यंविधीसाठी मदतकार्य करणाऱ्या माणुसकी रुग्ण सेवा समुहाचे समाजसेवक सुमित पंडित यांना सांगितले त्यास तात्काळ प्रातिसाद देऊन , अंत्यसंस्काराची जबाबदारी माणुसकी समूहाने स्विकारली.
आज दि.१४-१-२३ रोजी कागदोपत्री पुर्तता करुन शासकीय रुग्णालयातील शवआगारा मधून मयताचा मृतदेह खाजगी रुग्णवाहीकेने अंत्यविधीसाठी बेगमपुरा स्मशानभूमी येथे नेऊन अंतिमसंस्कार करण्यात आला .सिल्लोड पोलीसांनी व माणुसकी समूहाच्या टीम ने अत्यंविधीसाठी मदतकार्य केले.
वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक मुदिराज,पो.हे.काँ.बनसोड व माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडीत, प्रा. शरद सोनवणे , बोधी बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या सौ.रंजना दंदे,माणुसकी समुहाच्या सभासदांनी अंत्यविधीसाठी आर्थिक मदत जमा करुन,मदतकार्य केले.
आतापर्यंत कितीतरी बेवारसाच्या अत्यंविधीसाठी मदतकार्य करण्यात आलेले आहे
माणुसकी समुह कितीतरी गोरगरीबांना अहोरात्र मदत करत आलेला आहे.आतापर्यंत बऱ्याच बेवारस रुग्णांचे अत्यंसंस्कार
माणुसकी रुग्ण सेवा समुहाने केलेले आहे परंतु अत्यंविधी बेवारस म्हटल की त्या बेवारसाच्या डेड बाँडी चा दफनविधी च करावा लागतो. शहरातील बेगमपुरा स्मशानभूमीत सगळेच मृतदेह दफन केले जातात, खड्डे खोदायला कोन्ही ही पैसे देवुन ही तयार होत नाही कारण एवढी भयानक परिस्थिती आहे की खड्डे खोदायला सुरवात केली की आगोदरचच्याच जागी सापळे
जागोजागी आढळतात , म.न.पा.ने बेवारसाच्या अत्यंविधीसाठी लक्ष देणे गरजेचे आहे असे समाजसेवक सुमित पंडीत यांनी संगितले.

