1 min read

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

Loading

महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील

धरणगाव – आज दिनांक १२ जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती महात्मा फुले स्कूल धरणगाव येथे उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार ज्येष्ठ शिक्षिका पी आर सोनवणे , पर्यवेक्षक एम बी मोरे तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनी यांच्या हस्ते दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस एन कोळी यांनी केले. शाळेचे इतिहासचे ज्येष्ठ अभ्यासक व्ही टी माळी यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब ह्या ” स्वराज्य संकल्पिका होत्या त्यांचे कार्य आपल्या भाषणातून व्यक्त केले.मुख्याध्यापक जे.एस.पवार यांनी युवा दिनानिमित्त युवक कसा असावा ? याविषयी स्वामी विवेकानंदांचे विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.एन.कोळी यांनी तर आभार प्रदर्शन एस.व्ही. आढावे यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *