1 min read

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

Loading

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

मुंबई प्रतिनिधी

आज अंगणवाडी कर्मचारी कृती समितीची मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मा. महिला व बालविकास मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या सोबत वर्षा बंगल्यावर बैठक झाली.

२६ जानेवारी पर्यंत समाधानकारक मानधन वाढ जाहीर करण्यात येईल. लवकरच नवीन चांगला मोबाईल देण्यात येईल, थकित सेवासमाप्ती लाभ येत्या तीन महिन्यांत देण्यात येईल असे त्यांनी मान्य केले. मराठी भाषेत पोषण ट्रॅकर ॲप उपलब्ध करण्याबाबत १६ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात प्रात्यक्षिक देण्यात येईल अशी माहिती आयसीडीएस आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

जवळपास एक तासभर चाललेल्या बैठकीत अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व तपशीलवार चर्चा झाली. प्रशासकीय पातळीवरील प्रश्नांबाबत आयुक्तांनी लवकरच बैठक घेण्याचे मान्य केले.

बैठकीत समाधानकारक चर्चा झाली व कालबद्ध पद्धतीने मानधन वाढ, नवीन मोबाईल व सेवा समाप्ती लाभ देण्याचे त्यांनी मान्य केले त्यामुळे मासिक अहवाल, बैठका व प्रशिक्षणावरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला. तसेच पोषण ट्रॅकर ॲप बाबत १६ जानेवारी रोजी उच्च न्यायालयात जो आदेश मिळेल त्याचे पालन शासन, प्रशासन व कृती समिती यांच्याकडून केले जाईल.

२६ जानेवारी पर्यंत शासनाच्या घोषणेची वाट पाहून कृती समिती आपला पुढच्या लढ्याबाबतचा निर्णय घेईल असा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे.
बैठकीत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने एम ए पाटील, शुभा शमीम, निशा शिवूरकर, माधुरी क्षीरसागर, भगवानराव देशमुख, अतुल दिघे व जयश्री पाटील उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करिता

एम ए पाटील शुभा शमीम
कमल परुळेकर दिलीप उटाणे
भगवानराव देशमुख
जीवन सुरुडे जयश्री पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *