1 min read

उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी सांस्कृतिक गीत गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम…

Loading

उपक्रमशील शिक्षक सुधीर चौधरी सांस्कृतिक गीत गायन स्पर्धेत पुरुष गटात प्रथम…

अमळनेर प्रतिनिधी-

आज दिनांक11/1/2023 तारखेला साने गुरुजी हॉल पंचायत समिती अमळनेर येथे शिक्षक कर्मचारी अधिकारी क्रीडा स्पर्धेचे विजय संघाचे तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे विजयी शिक्षक यांना अमळनेर पंचायत समिती तर्फे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला त्यात मारवड बीट अंतर्गत येणारे शिक्षक श्री सुधीर शांताराम चौधरी जि प शाळा तांदळी यांचा सांस्कृतिक गीत गायन, पुरुष गटात प्रथम क्रमांक आल्याबद्दल त्यांचा येथोचित सत्कार तालुक्याचे आदरणीय गटशिक्षणाधिकारी श्री विश्वास पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आला सोबत तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री शिंदे साहेब तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी डी धनगर साहेब मारवड बीटाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री रावसाहेब पाटील सर्व केंद्रप्रमुख मान्यवर व क्रीडा शिक्षक श्री वाघ सर व श्री दत्ता सोनवणे सर व सर्व सहभागी स्पर्धक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. व पुढील जिल्हा स्पर्धा साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *