महाराष्ट्राच्या जनतेने वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाला सहकार्य करावे :: शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन, राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उत्साहात मुंबई येथे उद्घाटन.
![]()



महाराष्ट्राच्या जनतेने वाहतुकीचे नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाला सहकार्य करावे :: शंभूराजे देसाई यांचे प्रतिपादन. राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उत्साहात मुंबई येथे उद्घाटन.
मुंबई ठाणे ( प्रतिनिधी )::महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 च्या शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांच्या हस्ते, प्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन व बंदर विभागाचे प्रधान सचिव राग जैन, वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल, वाहतूक विभागाचे सह आयुक्त मुंबई प्रवीण पडवळ, महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनीलाल शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा समादेशक दिलीप स्वामी, जितेंद्र सोनवणे , विजय भामरे, योगेश अहिरे, संतोष हंडाळ, शरद बोरसे, व करंन जडेजा,या आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ने प्रसिद्ध हिंदी सिने अभिनेते जॅकी श्रॉफ व महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांना बालभारती निर्मित रस्ता सुरक्षा व नागरी संरक्षण या विषयाचे पुस्तक भेट देऊन आर एस पी विषयाची माहिती व गरज याबाबत थोडक्यात माहिती दिली.परिवहन अधिकारी दिपक शिंदे साहेब यांच्या प्रमुख सहकार्याने डॉ. मनिलाल शिंपी यांचा हस्ते दीप प्रज्वलन करण्याचा सन्मान देण्यात आला.संपूर्ण आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट चे परिवहन सचिव, परिवहन आयुक्त,अप्पर वाहतूक पोलिस महासंचालक, वाहतूक पोलीस आयुक्त मुंबई यांच्यासह सेलिब्रिटी अभिनेते जॅकी श्रॉफ व महाराष्ट्राचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराजे देसाई यांनी अभिनंदन आणि कौतुक केले. रस्ता सुरक्षा सप्ताह 2023 चा संपूर्ण उद्घाटनाच्या कार्यक्रमाची बैठक नियोजन व्यवस्था परिवहन अधिकारी दीपक शिंदे यांनी केली होती. परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी उपस्थित सर्व आदरणीय पाहुण्यांचे , महाविद्यालय विद्यार्थी व शिक्षक बंधू भगिनींचे विविध संस्थांचे विशेष आभार मानले.

