1 min read

कुऱ्हा जि.प.उर्दू शाळेत फातिमाबी शेख जयंती साजरी
[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ]

Loading

कुऱ्हा जि.प.उर्दू शाळेत फातिमाबी शेख जयंती साजरी
[ सत्यशोधक समाजातर्फे आयोजित स्पर्धांचे प्रमाणपत्र वितरण ]

जि.प.उर्दू शाळा कुर्‍हा ( ता .भुसावळ ) येथे दिनांक ९ जानेवारी २०२३ रोजी मुख्याध्यापक रुबिना परवीन खालिद खान यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या सहकारी शिक्षिका फातिमाबी शेख यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.सत्यशोधक समाज संघ,जळगाव आयोजित शाळास्तरीय सुंदर हस्ताक्षर व रंगभरण स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.विद्यार्थ्यांचा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सत्यशोधक समाज संघ अधिवेशनाच्या ( पानाचे कुऱ्हे ) औचित्याने महात्मा ज्योतिराव फुले यांचे सत्यशोधकीय कार्य विद्यार्थी व कुटूंबियांपर्यंत पोहोचावे आणि विद्यार्थ्यांमध्ये मानवी मुल्यांची जोपासना होऊन ते सत्यशील , समाजाभिमुख निर्भय देशप्रेमी होऊन त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्दिष्टपुर्तीसाठी विजय लुल्हे यांच्या संकल्पनेने स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धा निहाय गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे – *सुंदर हस्ताक्षर स्पर्धा – * : -* प्रथम क्रमांक : – मरियम खान खालिद खान ( ५ वी )* द्वितीय क्रमांक – कशफ शैख युनुस ( ७ वी ) * तृतीय क्रमांक – आयशा हशन शाह ( ७ वी )

  • रंगभरण स्पर्धा : – * प्रथम क्रमांक – आवेश शेख युनूस (६ वी ) * द्वितीय क्रमांक – जिशान शेख जाकीर ( ७ वी )* तृतीय क्रमांक – मुजाहिद सत्तार शाह ( ७ वी )
    फातिमाबी शेख यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती मुख्याध्यापक रुबिना परवीन खालिद खान यांनी दिली .हस्ताक्षर स्पर्धेचे मूल्यांकन स्पर्धा संयोजक पर्यवेक्षक रिजवान सर व रंगभरण स्पर्धेचे मुल्यांकन रुबिना मॅडम यांनी केले.स्पर्धेचा निकाल मुख्याध्यापिकांनी घोषित केला.स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना थोर शिक्षिका फातिमाबी शेख यांच्या जयंतीच्या औचित्याने सोमवार दि .९ जानेवारी २०२३ रोजी सत्यशोधक संघातर्फे मुख्याध्यापक रुबिना परवीन व रिजवान सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी सत्यशोधक समाज संघाचे संस्थापक राज्याध्यक्ष अरविंद खैरनार , राज्य सचिव डॉ. सुरेश झाल्टे ,सुधाकर बडगुजर व प्रमोद उंबरकर, पत्रकार योगेश गांधेले सर यांनी प्रेरणा दिली .स्पर्धेच्या यशस्वितेसाठी शरीफ खान सरांनी अमूल्य सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *