ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या उमेदवारीला शिक्षकांच्या आनंदाला उधान….
![]()



ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचा उमेदवारी अर्ज शिक्षकांच्या आनंद आणि उत्साहात दाखल
मुंबई ठाणे( मनिलाल शिंपी):: कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा उमेदवारी अर्ज आज कोकण भवन या ठिकाणी उपायुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी श्री मनोज रानडे साहेब यांच्याकडे युतीचा उमेदवार म्हणून दाखल केला, *याप्रसंगी माननीय श्री . रवींद्रजी चव्हाण साहेब- (सार्वजनिक बांधकाम मंत्री,) माननीय श्री दीपक केसरकरसाहेब - (शालेय शिक्षण मंत्री,) माननीय श्री. उदयजी सामंत साहेब- (उद्योग मंत्री) , आमदार किसनजी कथोरे साहेब, आमदार भरत गोगावले साहेब, आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेशजी बालदी साहेब, आमदार बालाजी किनीकर , आमदार निरंजन डावखरे साहेब, आमदार महेंद्र थोरवे साहेब, आमदार महेंद्र दळवी साहेब, माजी आमदार नरेंद्र पवार साहेब , जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई पाटील, नरेश म्हस्के साहेब, गोपाळ लांडगे साहेब, माजी नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे, अनिल बोरनारे ,विकास पाटील, सुधीर घागर सर, आकाश तांबे, रवींद्र पालवे, अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी व बाळासाहेबांच्या शिवसेना जिल्हाप्रमुख , नगराध्यक्ष ,नगरसेवक पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते* *ज्ञानेश्वर म्हात्रे सर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास सर्व मंत्र्यांनी व आमदारांनी व्यक्त केला, "शिक्षकाचा आमदार शिक्षक झालाच पाहिजे" असे मत व्यक्त करून ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना शुभेच्छा दिल्या* *अनेक संस्थांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक व' शिक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती, तसेच ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना पाठिंबा दिलेल्या अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते उपस्थित शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते विष्णू विशे यांनी आमचे प्रतिनिधी शी बोलताना दिली.*

