1 min read

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रामनाथ पाटील यांची बिनविरोध निवड!

Loading

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रामनाथ पाटील यांची बिनविरोध निवड!

ठाणे,कल्याण (मनिलाल शिंपी) ::
भिवंडी तालुक्यातील सर्व गुण संपन्न असलेल्या वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ.राजूबाई बाळकृष्ण नाईक यांना दिलेला कार्यकाल संपल्यानंतर त्यांनी सह खुशीने आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ. योगिता नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामसेविका कु. श्वेता कृष्णा पाटील यांच्या खास उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. उपसरपंच पदासाठी श्री. रामनाथ रामचंद्र पाटील यांचा एकमेव नाम निर्देश पत्र आल्यामुळे अध्यासी अधिकारी तथा सरपंच सौ.योगिता नरेंद्र पाटील यांनी श्री. रामनाथ रामचंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले, त्यांच्या निवडीची घोषणा होताच सर्व समर्थकांनी फटाक्यांच्या आतश बाजीत जंगी स्वागत केले,
यावेळी माजी सरपंच राम एकनाथ भोईर, माजी सरपंच श्री. अमित रामदास भोईर, मावळत्या उपसरपंच सौ. राजू बाई बाळकृष्ण नाईक, सन्माननीय सदस्या सौ.प्रेसिता भगिरथ पाटील, सौ.वनिता अनिल पाटील, या सर्वांनी उपस्थित राहून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्यामुळे सर्वांचे आभार नवनिर्वाचित उपसरपंच श्री रामनाथ पाटील यांनी मानले, तसेच नवनिर्वाचित उपसरपंच रामनाथ पाटील यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी वळ/ कैलास नगर वळपाडा या दोन्ही गावातील आजी माजी सरपंच आजी-माजी सदस्य तसेच ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते, मला बिनविरोध उपसरपंच निवडून देऊन माझ्यावर सर्व ग्रामस्थांनी तसेच सर्व सदस्यांनी विश्वास ठेवला त्यामुळे मी सर्वांचे पुन्हा मनापासून आभार मानते असे उपसरपंच रामनाथ पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले, ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी
सरपंच ,उपसरपंच ,सन्माननीय सदस्य व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *