1 min read

अमळनेरला माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणूकीबाबत
विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

Loading

अमळनेरला माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणूकीबाबत
विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-
जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीची सध्या होऊ घातलेल्या शिक्षक पतपेढीच्या निवडणुकी संदर्भात अमळनेर येथील जी.एस हायस्कूलमध्ये विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष आर .एच बाविस्कर होते. व्यासपीठावर माजी अध्यक्ष संभाजी पाटील, पतपेढीचे अध्यक्ष व शिक्षक नेते शालिग्राम भिरूड, संघटक एस के पाटील जळगांव व सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख, जी.एस.हायस्कूल चे मुख्याध्यापक.डी एच ठाकुर,
होते.
अगोदर जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या जनरल गटातून बहुमताने निवडून आलेल्या पतपेढीचे मा. अध्यक्ष व शिक्षक नेते शालिग्रामजी भिरूड सर यांचा विविध संघटनेच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला.
जळगाव माध्यमिक पतपेढीचे मा. अध्यक्ष संभाजी पाटील व शालिग्राम भिरूड यांनी जळगाव जिल्हा पतपेढीची आजतागायत झालेली प्रगती व सभासदांसाठी घेतलेले निर्णय या संदर्भामध्ये सविस्तर माहिती सांगितली. जिल्हा पतपेढी मध्ये सभासदांच्या विश्वास असल्यामुळे भिरूड सरांना पुन्हा निवडून दिले ही त्यांच्या कामाची पावती आहे. असे संभाजी पाटील यांनी सांगितले. तर भिरूड सरांनी
आजतागायत पतपेढीचा अध्यक्ष म्हणून असतांना सभासद हितांचे कोणकोणते निर्णय घेतले गेले व पतपेढीच्या पारदर्शक कारभाराबद्दल सविस्तर माहिती सांगितली. लोकांमध्ये काही चुकीची माहिती पसरवण्याची काही मंडळी प्रयत्न करत आहेत. माध्यमिक शिक्षक पतपेढीचे सभासद सुज्ञ आहेत. त्यांना सांगण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जिल्हा पतपेढीचा कारभार अत्यंत पारदर्शक आहे. सभासद हितांसाठीच आजपर्यंत अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. पतपेढीला जुना इतिहास आहे. आणि त्याचीच वाटचाल अशीच प्रगतीपथावर भविष्यात चालावी यासाठी सभासदांनी योग्य उमेदवारांना निवडून द्यावे असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आर एच बाविस्कर यांनी माध्यमिक शिक्षक संघ व संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे कोणकोणते प्रश्न मार्गी लागले याची सर्व माहिती देत सभासदांना संघटित होण्याचे आवाहन केले. सर्व संघ आज अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत पण संघटनेमध्ये कोणताही कार्यक्रम असो,वा धरणे आंदोलन, तरी सभासद आपल्या मागण्यांसाठी उपस्थित राहत नाही ही शोकांतिका आहे. आपण अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पाहतो . त्यांची एकजूट त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला भाग पाडते.याचा बोध सभासदांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कर्मचाऱ्यांकडे अनेक आव्हाने आहेत या सर्व आव्हानांना पळवून लावायचं असेल तर एकजूट महत्वाची आहे असे त्यांनी सांगितले व सध्या होऊ घातलेल्या माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत योग्य उमेदवारांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून द्या. निवडणूक कशी बिनविरोध होईल याचा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावा. असे त्यांनी सांगितले अमळनेर तालुक्यातून सात फार्म निवडणुकीसाठी आले आहेत. तरी सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बसून योग्य उमेदवारांची बिनविरोध निवड करावी असेही त्यांनी सांगितले आपापसातील मतभेद बाजूला ठेवा व एकसंघ राहा असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक संघाचे संजय पाटील यांनी केले यावेळी कला संघटनेचे आर.डी चौधरी ,सचिन साळुंखे, नितीन सोनवणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील ,माजी अध्यक्ष एम.ए पाटील ,साने गुरुजी शिक्षक पतपेढीचे मानद सचिव तुषार बोरसे ,विज्ञान संघटनेचे डी.ए धनगर,
ओबीसी शिक्षक संघटनेचे ईश्वर महाजन, शिक्षक भारती संघटनेचे आर जे पाटील ,क्रीडा संघटनेचे एस.पी.वाघ, निवृत्ती पाटील, सोपान भवरे जुनी पेन्शन संघटनेचे प्रभुदास पाटील, आर जे पाटील,राहुल बहिरम, चंद्रकांत कंखरे, क्रिडा शिक्षक एस पी वाघ,किरण पाठक, एन एल पाटील,,विशाल वाघ, राजेंद्र पाटील, हिंदी अध्यापक मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील,ज्ञानेश्वर ईनशुलकर
कंखरे सर, पालवे सर आर्यन पाटील धरणगाव ,सर्जेराव पाटील ,पाठक सर ,भदाणे सर पारोळा, प्रफुल पाटील, धनगर सर, कांगणे सर,
शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जितेंद्र ठाकूर, यासह विविध संघटनेचे पदाधिकारी व शिक्षक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *