भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि संविधान गौरवा निमित्त व्याख्यानाचे आयोजन
![]()

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि संविधान गौरवा निमित्त व्याख्यानाचे आयोजन
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने आणि संविधान गौरवा निमित्त आप्पासाहेब झाल्टे प्रतिष्ठान व महाराष्ट्र जन क्रांती मोर्चा तर्फे भारतीय संविधानाचे अभ्यासक तथा माजी सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांचे व्याख्यान आयोजित केले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठविधीज्ञ राजेश झाल्टे, भीमरमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल इकरा एज्युकेशन सोसायटीचे डॉ. करीम सालार, विद्यार्थी सहाय्यक समितीचे प्राचार्य एस. एस. राणे, मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील,खानदेश माळी महासंघाचे संतोष इंगळे, नगरसेवक सुरेश सोनवणे, संबोधी फाउंडेशनच्या सरोजिनी लभाने उपस्थित राहणार असून शनिवार दिनांक 7 जानेवारी 2023 सकाळी१०.३० वाजता अल्पबचत सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थितिचे आवाहन विजयकुमार मौर्य, प्रा. डॉ. सत्यजित साळवे, बापू पानपाटील, दिलीप सपकाळे, अमोल कोल्हे, दत्तू सपकाळे, शिवराम शिरसाट, अनिल सुरडकर, प्रा. डॉ. प्रदीप सुरवाडकर, वाल्मीक सपकाळे, महिंद्र केदार इत्यादींनी केले आहे.

