1 min read

भाऊसाहेब राऊत विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा

Loading

भाऊसाहेब राऊत विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन साजरा

येथील भाऊसाहेब राऊत विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. एस. तायडे तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती पी व्ही बाविस्कर, श्री.ए.एस.बाविस्कर, श्रीमती. एस. आर. शिरसाटे यांची उपस्थिती होती. प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी इ.९ वी अ च्या विद्यार्थिनी नेहा व पूजा यांनी सावित्रीबाई यांचे जीवनावर पाळणा सादर केला. तर अश्विनी सपकाळे, लक्ष्मी चव्हाण, डिंपल सपकाळे, दैवशाला दांडगे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव करणारे गीत सादर केले. यानंतर अश्विनी बाविस्कर, रेणुका बाविस्कर, दैवशाला दांडगे, डिंपल सपकाळे, लक्ष्मी चव्हाण, भावना पाटील, पवन सोनवणे, योगेश आढाळे, जागृती सोनवणे, दिव्या महाले, या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांचे जीवनकार्यावर आपले मनोगत व्यक्त केले. तर श्रीमती. व्ही. एन. नारखेडे व मुख्याध्यापक एल एस तायडे यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट उलगडला. कार्यक्रमाचे खुमासदार शैलीत सूत्रसंचालन इ.१० वी अ ची विद्यार्थ्यांनी पौर्णिमा सपकाळे हिने तर आभार इ.१० वी ब च्या अश्विनी सपकाळे हिने मानले. भाषणात सहभागी सर्वांचा भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *