सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी-
वृषाली चौधरी
![]()

सावित्रीमाईंच्या जीवन कार्यांची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी आहे.
वृषाली चौधरी
असोदा= माणसाच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या, स्रीला आत्मसन्मानाची लढाई जिंकून देणाऱ्या सावित्रीबाईंच्या जीवन कार्याची मशाल मानवातील माणुसकी जागृत ठेवणारी असून त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला दिशा आणि समृद्ध जीवनवाट प्राप्त होत गेल्याचे मत वृषाली चौधरी यांनी सार्वजनिक विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक प्रशांत कोल्हे यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श विद्यार्थी, विद्यार्थिनीनी आपल्या डोळ्यासमोर ठेवत समाज व्यवस्थेत आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून अनेक बदल घडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तर श्रीमती भारती पाटील यांनी सावित्रीबाईंनी शिक्षणासोबतच स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी व सामाजिक रूढी परंपरांची बंधन मोडीत काढत जो नवा विचार दिला तो नवा विचार आपल्या जीवनाला समृद्ध करणारा असा आहे असे मनोगतात मांडले. दक्ष कोल्हे, स्वप्नील कासार, दुर्गेश चिरमाडे, तृप्ती बिऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत माहिती सांगितली.तसेच सादिया पिंजारी,नेहा काकडे , साक्षी चौधरी ,मोहिनी पाटील व इतर या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांच्यावर आधारित गीते सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण कोळी या विद्यार्थ्याने तर आभार अबुझर पिंजारी या विद्यार्थ्याने मानले.कार्यक्रमास पर्यवेक्षक डॉ. मिलिंद बागुल सांस्कृतिक विभाग प्रमुख मंगला नारखेडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी सर्व महिला शिक्षकांचा बालिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

