1 min read

अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात,जि..प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा समावेश

Loading

अमळनेर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात

जि.प.अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांचा समावेश

अमळनेर- येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन उत्साहात करण्यात आले. यात सुमारे ३५० जि प व पं.स.अधिकारी, शिक्षक, ग्रामसेवक व आरोग्य, बांधकाम, पाणी पुरवठा, स्थानिक कार्यालय कर्मचारी यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण व जळगाव जिल्हा क्रीडा समिती नियोजन बैठकीतील निर्णय नुसार जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार-प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक असल्याने अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्य, शारिरीक सुदृढता, एक संघपणे काम करणे याबाबत प्रभावी सहाय्य होण्यासाठी जिल्हा परिषद जळगाव तर्फे तालुका व जिल्हास्तर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याचे गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी व्ही.एच.पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर, शापोआ अधिक्षक भुपेंद्र बाविस्कर व धनदाई एज्युकेशन संस्थेचे चेअरमन प्रा डी.डी.पाटील, प्राचार्य प्रा के डी पाटील, पंचायत समितीचे किशोर पाटील, संजय पाटील, दत्तात्रय सोनवणे, सुनिल वाघ, उमेश काटे यांच्या उपस्थितीत नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.शहरातील जय योगेश्वर माध्य विद्यालयात कबड्डी, व्हॉलीबॉल, कॅरम व बुध्दीबळ, जी.एस. हायस्कूलमध्ये खो-खो, प्रताप महाविद्यालयात बॅडमिंटन, तालुका क्रीडा संकुलात क्रिकेट व गटसाधन केंद्र मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन यासाठी तालुका समन्वयक म्हणून उपशिक्षक दत्तात्रय सोनवणे, क्रीडा शिक्षक सुनिल वाघ, उमेश काटे व संजय पाटील यांनी काम पाहिले. क्रीडा प्रमुख म्हणून केंद्रप्रमुख शरद सोनवणे, चंद्रकांत साळुंके, दिलीप सोनवणे, अशोक सोनवणे, रविंद्र पाटील, छगन पाटील, भगवान पाटील, विश्वास पाटील, गजानन पाटील यांनी तर क्रीडा समन्वयक तथा संपर्क प्रमुख म्हणून विलास मोरे, अरुण मोरे, हिरालाल पाटील, सुधीर चौधरी, किशोर बागुल, विजय पाटील, प्रशांत पाटील, कुणाल पवार, ज्ञानेश्वर कुवर, प्रदीप महाजन, बापूराव चव्हाण, अशोक पाटील, धिरज पाटील, मुकेश पाटील, दत्तात्रय सोनवणे, प्रदीप कंखरे यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे पंच तथा परिक्षक म्हणून महेश माळी, स्वप्निल पाटील, मयूर बारस्कर, सुयश पाटील, प्रीतेश पुरणकर, प्रशांत वंजारी, संजय बोरसे, के आर बाविस्कर, बापूराव माधवराव सांगोरे, प्रतिक बाविस्कर, गिरीष रवंदळे, स्वप्नील पाटील, अतुल बोरसे, महेश्वर बोरसे, पूरब निकुंभ, पंकज पाटील, गोकुळ बोरसे, वसुंधरा लांडगे, प्रदीप महाजन यांनी काम पाहिले.

स्पर्धेत सहभागी संघ

क्रिकेट – पुरुष संघ- 13
कबड्डी – पुरुष संघ- 2 व महिला संघ- 1
खो-खो – पुरुष संघ- 4 व महिला संघ- 1
व्हॉलीबॉल – पुरुष संघ- 4
कॅरम – पुरुष- 18 व महिला- 5
बुध्दीबळ – पुरुष- 26 व महिला- 6
बॅडमिंटन – पुरुष- 16 व महिला- 11
सांस्कृतिक विभाग
गायन – पुरुष- 8 व महिला- 6
नृत्य – महिला- 1

नाटिका – पुरुष- 1

अमळनेर- तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना गटविकास अधिकारी विशाल शिंदे शेजारी गटशिक्षणाधिकारी व्ही एच पाटील, डी डी पाटील, के डी पाटील आदी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *