1 min read

कल्याण मध्ये यंगस्टार युथ फाउंडेशन तर्फे प्रथमच मोफत नाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन. युवा संघटक रुपेश भोईर यांचे सर्वसमावेशक आणि निःपक्षपाती उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद आहे.::पोलीस निरीक्षक, सुनिल पवार. ठाणे,

Loading

कल्याण मध्ये यंगस्टार युथ फाउंडेशन तर्फे प्रथमच मोफत नाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन. युवा संघटक रुपेश भोईर यांचे सर्वसमावेशक आणि निःपक्षपाती उल्लेखनीय कामगिरी कौतुकास्पद आहे.::पोलीस निरीक्षक, सुनिल पवार. ठाणे,

कल्याण( मनिलाल शिंपी ):यंगस्टार युथ फाउंडेशन कल्याण तरुण सामाजिक कार्यकर्ते रुपेश भोईर यांच्या संकल्पनेनुसार कल्याण शहरात प्रथमच अभिनय कार्यशाळा नाटक आणि चित्रपट क्षेत्रामध्ये आजच्या युवक युवतींना नाट्य व अभिनय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करण्याची संधी मिळण्यासाठी प्रसिद्ध प्रशिक्षक दिग्दर्शक श्री सुनील परब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील तेली सभागृहात ५ दिवसासाठी मोफत नाट्य अभिनय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वामीनारायण हॉलचे दिनेश भाई ठक्कर, आर एस पी कमांडर मनिलाल शिंपी यांच्या हस्ते या अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेचे कल्याण शहर संघटक रुपेश चंद्रकांत भोईर. सौ.रूपालीताई भोईर यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण शहरात प्रथमच अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले त्याबद्दल संपूर्ण कल्याण परिसरातून रुपेश दादा भोईर यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.पोलीस मित्र आणि माहिती अधिकार कमिटीचा शहराध्यक्ष श्रीमती करुणा अहिरे यांनीही अभिनय, कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *